टीव्ही इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सायंतानी घोष पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘कुमकुम’ या टीव्ही मालिकेतून तिने इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात केली. मात्र, ‘नागिन’ या मालिकेने तिला घराघरात ओळख मिळाली. सायंतानी घोषने ‘नागिन’मधून इंडस्ट्रीत स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं, पण या ओळखीने तिला दीड वर्ष बेरोजगारही ठेवलं. खरं तर, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या कठीण दिवसांबद्दल सांगताना सायंतानी घोषने तिची व्यथा मांडली आहे.
आपल्या संघर्षाची कहाणी सांगताना सायंतानी घोष (sayantani ghosh) म्हणाली की, ‘तिला ‘नागिन’मधून प्रचंड प्रसिद्धी मिळाली. वयाच्या अवघ्या 23 व्यावर्षी तिने घर विकत घेतले होते. मात्र, 2009 मध्ये ती ‘नागिन’ मालिका संपल्यानंतर बेरोजगार झाली. ‘नागिन’च्या इमेजमुळे तिला चांगले काम मिळत नव्हते. काही भूमिकांच्या ऑफर्स आल्या तरी तिने स्वतः नकार दिला. कारण, त्या नागिनच्या पात्रासारखा मजबूत नव्हता.’ अशा परिस्थितीत तिला पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये ओळख मिळत नव्हती.
सायंतानी घोष हिने सांगितले की, ‘लोकांमध्ये तिच्या नागिनच्या प्रतिमेमुळे निर्मात्यांनी तिला कोणतेही मोठे काम दिले नाही. एक ते दीड वर्षे ती घरी बेरोजगार बसली. तारुण्यात, तिला पैसे कसे वाचवायचे हे देखील माहित नव्हते. अशा परिस्थितीत तिच्याकडे पैसेही नव्हते. तिला घरखर्च चालवणे अवघड झाले होते. तिने वडिलांकडे पैसे मागितले नाहीत, कारण वडिलांकडे पैसे मागणे तिला आवडत नव्हते.’
View this post on Instagram
सायंतानीने सांगितले की, ‘पैसे संपल्याने तिला स्वतःचे घर विकावे लावले. हृदयावर दगड ठेवून तिने घर विकले. तिने विकत घेतलेले घर तिला कधीही विकायचे होते, पण ते होऊ शकले नाही. घर विकल्यानंतर ती भाड्याच्या घरात राहायला गेली आणि तिथूनच तिचा संघर्ष सुरू झाला.’
सायंतानी घाेष हिच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘कुमकुम’, ‘घर एक सपना’, ‘सबकी लाडली बेबाे’, ‘नागिन’ या सारख्या दमदार मालिकेत काम केले.(tv actre`s`s sayantani ghosh had no work after naagin show she sold her own house tv actress revealed her career struggles)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रितेश देशमुख आणि जिनिलीया यांच्याकडून ‘वेड तुझे’ गाण्यातून प्रेक्षकांना देणार खास ट्रीट
बाेनी कपूर रमले श्रीदेवीच्या आठवणीत; फाेटाे शेअर करत म्हणाले, ‘हा आनंदाचा क्षण…’