Tuesday, July 9, 2024

शिवांगी जाेशी वाढदिवस साजरा करण्यासाठी पाेहचली हाॅटेलमध्ये, पण अभिनेत्रीचा तोल बिघडला अन्….

ये रिश्ता क्या कहलाता है‘ या टीव्ही शोमध्ये नायरा सिंघानिया या नावाने घराघरात पोहोचलेल्या शिवांगी जोशीने 18 मे रोजी तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला. हा खास दिवस साजरा करण्यासाठी अभिनेत्री मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये कुटुंबीयांसह मित्रांसोबत पाेहचली. मात्र, यादरम्यान, अभिनेत्री कारमधून उतरताच पडता-पडता वाचली. नेमके काय झाले ? चला, जाणून घेऊया…

खरे तर, अभिनेत्री शिवांगी जाेशी (shivangi joshi) तिचा 25वा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका हाॅटेलमध्ये पाेहचली. यादरम्यान अभिनेत्रीने ऑरेंज कलरचा ड्रेस परिधान केलाे हाेता आणि साेबतच हाय हिल्स कॅरी केल्या हाेत्या. अशात अभिनेत्री कारमधून बाहेर पडताच तिचा तोल बिघडला आणि ती अडखळली. अशा परिस्थितीत शिवांगीच्या आईने तिचा हात धरून तिची काळजी घेतली, ज्याचा क्षण स्वतः शिवांगीने तिच्या स्टाेरीत शेअर केला आहे. यासोबतच अभिनेत्रीने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शिवांगी जाेशी अन् माेहसीन खान आहेत रिलेशनशिपमध्ये
शिवांगी जोशीचे नाव ‘ये रिश्ता क्या कहलाता है’चे को-स्टार मोहसिन खान आणि ‘बडे अच्छे लगते हैं 2’चे रणदीप राय यांच्यासोबतही जोडले गेले आहे. मोहसीन आणि शिवांगी 2017मध्ये एकमेकांना डेट करत हाेत. मात्र, काही वर्षानंतर त्यांचे ब्रेकअप झाले.

शिवांगीने 2013 मध्ये ‘खेलती है जिंदगी आँख मिचोली’ या शोमधून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. यानंतर ती ‘बालिका वधू’मध्ये दिसली. शिवांगीच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर ती सध्या ‘बेकाबू’ या मालिकेत काम करत आहे. या शोमध्ये ती परीच्या भूमिकेत दिसत आहे.(tv actress shivangi joshi reached to celebrate her birthday with family actress father helped her daughter)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील ‘या’ जोडप्यांमध्ये अतुट विश्वास; नावं पाहून तुम्हीही म्हणाल ‘जोडा असावा तर असा’
नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘ते’ सदाबहार डायलॉग, ज्यावर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

हे देखील वाचा