Wednesday, July 3, 2024

स्मृती इराणी यांचा 25 वर्ष जुना ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल; माॅडेलिंग करिअर येणार हाेते संपुष्टात

अभिनेत्री आणि महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. स्मृती इराणी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो कायमच शेअर करतात, ज्यावर युजर्स जबरदस्त प्रतिसाद देतात. अशात अलीकडेच त्यांनी त्यांचा 25वर्षे जुना व्हिडिओ शेअर केला आहे. खरंतर हा व्हिडिओ सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिरातीचा आहे. याद्वारे स्मृती इराणी यांनी पुन्हा एकदा पीरियड्सशी संबंधित टॅबूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (smriti irani) यांनी एका बड्या कंपनीसाठी ही जाहिरात केली होती. ही त्यांची पहिली जाहिरात असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये स्मृती इराणी मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना दिसत आहेत. क्लिपमध्ये, त्या एका महिलेच्या मासिक पाळीच्या ‘त्या पाच दिवसां’विषयी चर्चा करत आहे.

या पोस्टसोबत स्मृती इराणी यांनी लिहिले आहे की, ’25 वर्षांपूर्वी एका मोठ्या कंपनीसाठी माझी पहिली जाहिरात. मात्र, त्यांची थीम फॅन्सी नव्हती.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial)

स्मृती इराणीच्या पाेस्टवर चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट
यासोबत स्मृती इराणी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘होय, मी बारीक होते… याची आठवण करून देण्याची गरज नाही.’ अभिनेत्रीच्या या पोस्टवर युजर्स भन्नाट कमेंट करत आहेत. या व्हिडिओमध्ये स्मृती इराणी आहेत हे ओळखणे लोकांना कठीण जात आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘आज बरेच लोक या विषयावर सहज बोलतात, पण त्या काळात किती कठीण गेले असेल ते मी समजू शकताे. तुमच्या धाडसाला सलाम.’, तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘तू तेव्हाही हुशार होतीस आणि आजही आहेस.’ अशाप्रकारे चाहते स्मृती इराणीच्या पाेस्टवर जबरदस्त प्रतिसाद देत आहे.(tv actress smriti irani shares 25 year old sanitary pad ad on menstrual hygiene and breaking taboo with beautiful caption )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकिंग! प्रसिद्ध युट्यूबरचा अपघाती मृत्यू, 300 किमी प्रतितास वेगाने चालवत होता बाईक

‘कैरी’ हा नवा चित्रपट लवकरच येणार चाहत्यांच्या भेटीला, ‘हे’ दिग्गज कलाकार मिळणार पाहायला

हे देखील वाचा