Monday, June 23, 2025
Home टेलिव्हिजन सुष्मिता मुखर्जी यांचा सेटवर झाला अपघात, पाहा कशी करून घेतली जातेय जखमी अभिनेत्रीकडून शूटिंग

सुष्मिता मुखर्जी यांचा सेटवर झाला अपघात, पाहा कशी करून घेतली जातेय जखमी अभिनेत्रीकडून शूटिंग

बॉलिवूडची दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी सध्या स्टार भारतच्या ‘मेरी सास भूत है’ या शोमुळे चांगलीच चर्चेत आहे. या शोमधली त्याची स्टाइल प्रेक्षकांना प्रचंड आवडतेय. या शोमध्ये अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी एक भूत सासूच्या भूमिकेत आहे जी तिच्या मृत्यूनंतरही आपल्या सुनेचा छळ करण्यात आणि टोमणे मारण्यात कोणतीही कसर सोडत नाही. मात्र, यादरम्यान अभिनेत्रीबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. असे सांगण्यात येत आहे की, अलीकडेच सुष्मिता यांचा सेटवर अपघात झाला होता, ज्यादरम्यान त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली हाेती.

आजकाल सुष्मिता मुखर्जी (sushmita mukherjee) मालिकेमध्ये व्हीलचेअरवर बसलेली दिसत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, सुष्मिता यांचा 23 डिसेंबर रोजी सेटवर अपघात झाला. या अपघातात त्यांचा गुडघा जखमी झाला आहे, ज्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर त्यांनी 18 जानेवारीपासून पुन्हा शूटिंग सुरू केले. मात्र, शस्त्रक्रियेमुळे त्यांना उभे राहता येत नसल्याने त्या व्हीलचेअरचा वापर करत आहे. त्याची अवस्था पाहून लेखकांनी पटकथेत आवश्यक ते बदल केले आहेत.

सुष्मिता यांनी त्यांच्या दुखापतीची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. अभिनेत्री म्हणाल्या, ’23 डिसेंबरला मी मुंबईच्या बाहेरील भागात सेटवर शूटिंग करत होते, तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली. मला वाटतं, कदाचित माझी साडी जमिनीवर पडलेल्या तारांमध्ये अडकली असेल, पण मी इतका वाईट रीतीने पडले की मला माझ्या गुडघ्याला जखम झाल्याचे जाणवले. त्यानंतर मला ताबडतोब रुग्नालयात नेण्यात आले, ज्यानंतर माझी शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर मी दोन आठवडे विश्रांती घेतली, पण नंतर विश्रांती घेणे मला योग्य वाटले नाही’

सुष्मिता पुढे म्हणाल्या, “मी प्रॉडक्शन हाऊस आणि लेखकांची आभारी आहे की, त्यांनी मला व्हीलचेअरवर चित्रित करण्याचे मान्य केले. ”

‘मेरी सास भूत है’ या मालिकेमध्ये सुष्मिता मुखर्जी यांच्या व्यतिरिक्त विभव रॉय, भावना बलसावार, विकी आहुजा आणि विशाल चौधरी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. (tv actress sushmita mukherjee got injured on set of meri saas bhoot hai and producer ready for the shooting done on a wheelchair)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाची संजय राउतांनाही भुरळ, व्हायरल व्हिडिओ शेअर करत म्हणाले, वेड…

नववधू अथिया शेट्टी दिसली सिंपल लूकमध्ये, सिंदूर-मंगळसूत्र न घातल्याने संतापले युजर्स

हे देखील वाचा