Friday, July 5, 2024

काय सांगता! उर्फीने गरीब मुलांना वाटल्या 500च्या नाेटा, व्हिडिओ तुफान व्हायरल

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा अशा गोष्टींपासून कपडे बनवते आणि परिधान करते, ज्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. अशात उर्फी जावेद पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. मात्र, यावेळी अभिनेत्री तिच्या विचित्र ड्रेसमुळे नाही, तर रस्त्यावर नोटा वाटल्यामुळे चर्चेत आली आहे, ज्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.

उर्फी जावेद (uorfi javed) तिच्या बहिणीसोबत वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर तिच्या कारकडे जात हाेती. यादरम्यान उर्फीने रंगीत टू-पीस परिधान हाेता. अशात गाडीत बसण्यापूर्वी उर्फी गरीब मुलांना 500-500 च्या नोटा वाटू लागली. त्यानंतर एक मुलगा पुन्हा उर्फीकडे 500ची मागायला आला, तेव्हा अभिनेत्री म्हणाली, ‘मी आता याला पैसे दिले किती आगाऊ आहे हा’.

काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदला तिच्या कपड्यांमुळे मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एंट्री देण्यात आली नव्हती, ज्यामुळे ती खूप संतापली होती. यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत उर्फी जावेदने रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना फटकारले. तिने पोस्टमध्ये लिहिले की, ‘मुंबई खरोखरच 21वे शतक आहे का? आज मला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. जर तुम्हाला माझी फॅशनची निवड आवडत नसेल, तर ते ठीक आहे, परंतु त्याबद्दल माझ्याशी असे वागणे योग्य नाही, आणि जर ते तुम्हाला मान्य असेल, तर ते स्वीकारा. खोट्या गाेष्टी सांगू नका’.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

उर्फी जावेदने आपल्या करिअरची सुरुवात लोकप्रिय टीव्ही शो ‘टेढ़ी मेढ़ी फॅमिली’मधून केली होती. यानंतर ती ‘चंद्र नंदिनी’, ‘मेरी दुर्गा’ आणि इतर अनेक शोमध्ये दिसली. तिला सर्वाधिक लोकप्रियता करण जोहरच्या बिग बॉस ओटीटी या रिअॅलिटी शोमधून मिळाली. याशिवाय उर्फी जावेद ‘स्प्लिट्सविला’च्या 11व्या सीझनमध्ये एक मिसचीफ मेकर म्हणून दिसली आहे. (tv actress uorfi javed distributes 500 rupees note to poor kids post dinner at bandra restaurant video viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भाईजानसह ‘हे’ प्रसिद्ध कलाकार कोलकात्यातील कॉन्सर्टमध्ये ठाेकणार धूम, ‘इतक्या’ लाखात मिळणार तिकिट

रणवीरने भर मुलाखतीत दीपिकाला केले किस, अभिनेत्री लाजून झाली लाल, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा