Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘अरे! कोणीतरी आरतीचे ताट आणा…’, उर्फीचा ‘तो’ फोटो पाहून युजर्सला बसला आश्चर्याचा धक्का; म्हणाले…

आपल्या अनाेख्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असणारी उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेचा भाग बनली आहे. कपड्यांवरून ट्रोल हाेणारी उर्फी जेव्हा मीडियासमोर आली तेव्हा पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावले. उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती शॉर्ट ड्रेस नव्हे, तर पाकिस्तानी सूट घालून कारमधून खाली उतरताना दिसत आहे.

उर्फी (uorfi javed) हिचा हा व्हिडिओ F I L M Y G Y A N ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती अधिकच सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये उर्फीने जांभळ्या रंगाचा पाकिस्तानी शैलीचा सूट घातला आहे, तर तिचे केस खुले साेडले आहे, ज्यामध्ये उर्फीचे साैंदर्य अधिखच खुलले आहे. उर्फीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे आणि ते कमेंटमध्ये अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच तुफान व्हायरल हाेत आहे. इतकेच नव्हे, तर युजर्स या व्हिडिओवर भिन्नभिन्न कमेंट करत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की,’माझ्या डोळ्यात ऍसिड गेले आहे का? ती  मला पुर्ण कपड्यांमध्ये दिसत आहे …’, तर दुसऱ्या युजर्सने लिहिले, ‘कोणी आरतीचे ताट घेऊन या.. आज चमत्कार झाला आहे.’ अशात एकाने कमेंट करत लिहिले, ‘आज किमान तिने चांगले कपडे घातले आहेत, नाहीतर ती रोज कोणता भांग पिऊन असते ते माहीत नाही..’

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

उर्फी जावेद टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. सोशल मीडियावरही ही अभिनेत्री खूप लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर लाखो लोक तिला फॉलो करतात. (Tv actress uorfi javed new look pakistani suit video went viral on social media)

अधिक वाचा-
एकता कपूरने फाडला हाेता स्मृती इराणींचा कॉन्ट्रॅक्ट; वर्षांनंतर केला खुलासा, म्हणाली…
सिंदूर लावून रेखाचा राॅयल फाेटाेशूट, आघाडीची अभिनेत्री कॅटरिना ही म्हणाली…

हे देखील वाचा