Saturday, June 29, 2024

नागिनसारखं डाेलत उर्फीने केला डान्स; युजर्स म्हणाले, ‘आ गई जंगली कहीं की…’

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते. उर्फीने सायकल चेनपासून सेफ्टी पिनपर्यंत बनवलेले कपडे परिधान केले आहेत. नुकतीच अभिनेत्री सी-थ्रू ड्रेसमध्ये दिसली होती. अशात आता उर्फने तिच्या नवीन लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. काय आहे नेमके व्हिडिओमध्ये? चला जाणून घेऊया…

खरे तर, उर्फी जावेद (uorfi javed) हिने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा नवा लूक पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये उर्फीने लांबलचक ड्रेस घातला आहे. यासाेबतच तिने आपला लूक पुर्ण करण्यासाठी ब्लू इयररिंग्स, सॉफ्ट कर्ल ओपन हेयर आणि हाई हिल्स घातले आहे. अशात उर्फी न्यूड ग्लॉसी मेकअपमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

एकीकडे उर्फी जावेदचा हा लूक खूप पसंत केला जात आहे, तर नेहमीप्रमाणे काही लाेक उर्फीला ट्राेल करत आहे. एका युजरने ट्राेल करत लिहिले की, “आ गई जंगली कहीं की.” तर एकजण म्हणाला, “कुणीतरी हिला जंगलात सोडून या यार.” अशात आणखी एका नेटिझनने कमेंटमध्ये लिहिले की, “तिच्यात सुधारणा होणार नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

अलीकडेच मुंबईत बेटी फॅशन शो झाला, ज्यामध्ये उर्फी जावेदही पोहोचली होती. यादरम्यान अभिनेत्रीने सी-थ्रू ड्रेस परिधान केला होता, ज्यामुळे अभिनेत्रीला चांगलेच ट्रोल करण्यात आले.

उर्फी जावेदने आपल्या करिअरची सुरुवात लोकप्रिय टीव्ही शो ‘टेढ़ी मेढ़ी फॅमिली’मधून केली होती. यानंतर ती ‘चंद्र नंदिनी’, ‘मेरी दुर्गा’ आणि इतर अनेक शोमध्ये दिसली. तिला सर्वाधिक लोकप्रियता करण जोहरच्या बिग बॉस ओटीटी या रिअॅलिटी शोमधून मिळाली. याशिवाय उर्फी जावेद ‘स्प्लिट्सविला’च्या 11व्या सीझनमध्ये एक मिसचीफ मेकर म्हणून दिसली आहे. (tv actress uorfi javed wore a revealing dress shared video on instagram people trolled her)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कडक उन्हाळ्यात शहनाज गिलने वाढवले ​​इंटरनेटचे तापमान, केले आतापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटोशूट

गौरी खानच्या पुस्तक प्रकाशनवेळी शाहरुख खानने केली चूक, भर कार्यक्रमात सांगितले बायकोचे चुकीचे वय

हे देखील वाचा