Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

चित्रा वाघनंतर करणी सेनेची उर्फी जावेदला धमकी, अभिनेत्रीने केली महिला आयोगाकडे तक्रार

अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्स आणि आउटफिट्ससाठी सतत ट्रोल होत असते. उर्फीच्या फॅशन सेन्समुळे तिला सार्वजनिक ठिकाणी बला’त्काराच्या धमक्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या संदर्भात तिने महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली असून, मुंबई पोलिसांना तिला सुरक्षा पुरवण्याचे आदेश द्यावेत, असे आवाहन तिने केले आहे. माध्यमातील वृत्तानुसार, उर्फी जावेदने महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राजकीय फायद्यासाठी तिच्याविरोधात तक्रार दाखल केल्याचे म्हटले आहे.

उर्फी जावेद (urfi javed) हिने तिच्या तक्रार पत्रात महिला आयोगाकडे मागणी केली आहे की, तिला सुरक्षा द्यावी आणि मुंबई पोलिसांना तिची तक्रार गांभीर्याने घेण्याचे आदेश द्यावेत. उर्फीच्या तक्रारीवरून महाराष्ट्र महिला आयोगाने कारवाई केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चकनाकर यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

महिला आयोगाने उर्फी जावेदचे प्रकरण गांभीर्याने घेऊन तिला सुरक्षा पुरवण्याचे लेखी आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. चित्रा वाघ यांच्याप्रमाणेच करणी सेनेचे प्रमुख सुरजित सिंह राठौर यांनी उर्फीच्या ड्रेसिंग सेन्सचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी उर्फीला पूर्ण कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यास सांगितले.

तेव्हापासून उर्फी जावेदने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट पोस्ट केले होते, ज्यामध्ये ती जीवन आणि मृत्यूचा संदर्भ देत आहे. उर्फीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “आत्महत्येसाठी आयुष्य खूप लहान आहे.. धीर धरा तुम्ही मराल.” चित्रा वाघ यांनी केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी शनिवारी (दि. 14 जानेवारी)ला उर्फी जावेदचा जबाब नोंदवला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

चित्रा वाघ या महाराष्ट्र भाजपच्या महिला विभाग प्रमुख आहेत. त्यांनी उर्फी जावेद विराेधात सार्वजनिक ठिकाणी ‘अयोग्य’ कपडे परिधान केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर जावेदने आंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तिचा जबाब नोंदवला.(tv actress urfi javed get threat from karani sena after chitra wagh actress urfi  demand security from mahila ayog mumbai police )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
समुद्राच्या किनाऱ्यावर स्वानंदी टिकेकरचं फुललं साैंदर्य, एकदा पाहाच व्हिडिओ

रितेश देशमुख आणि जिनिलीया यांच्याकडून ‘वेड तुझे’ गाण्यातून प्रेक्षकांना देणार खास ट्रीट

हे देखील वाचा