Saturday, February 22, 2025
Home बॉलीवूड उर्फीने जावेद अख्तरांसोबतचा शेअर केला फाेटाे; म्हणाली, ‘शेवटी आज माझ्या आजोबांना…’

उर्फीने जावेद अख्तरांसोबतचा शेअर केला फाेटाे; म्हणाली, ‘शेवटी आज माझ्या आजोबांना…’

उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. तिचा प्रत्येक व्हिडिओ आणि फोटो शेअर होताच व्हायरल होतो. याशिवाय उर्फी तिच्या स्पष्टवक्ते आणि बोल्ड स्टाइलनेही खूप चर्चेत असते. अशातच आता उर्फीने सुप्रसिद्ध बॉलीवूड लेखक जावेद अख्तर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, ती आज तिच्या आजोबांना भेटली.

मिळालेल्या माहितीनुसार, उर्फी जावेद (urfi javed) नुकतीच एका फॅशन शोच्या निमित्ताने दिल्लीत गेली होती, जिथे तिची जावेद अख्तर (javed akhtar) यांच्याशी भेट झाली. आता अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टाेरीवर लेखकासह तिचा फाेटाे शेअर केला आहे, ज्यामध्ये उर्फीने निळ्या रंगाचा ओव्हरकोट परिधान केला आहे, तर जावेद अख्तर खांद्यावर शाल आणि राखाडी कुर्त्यामध्ये दिसत आहेत. दोघेही हसत हसत पोज देत आहेत. हा फोटो शेअर करत उर्फी जावेदने मजेशीर कॅप्शनसह जावेद अख्तर यांचे कौतुकही केले आहे.

urfi-javed-poses-with-javed-akhtar
Photo Courtesy Instagramurf7i

फोटो शेअर करताना उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “शेवटी आज माझ्या आजोबांना भेटले, ते देखील एक दिग्गज आहेत, बरेच लोक सेल्फी घेण्यासाठी पहाटेपासून रांगेत उभे होते, पण त्यांनी नाही म्हटले नाही, सर्वांनी त्यांच्याशी हसत हसत गप्पा मारल्या. ते खूप विनम्र आहे! त्यांना भेटून मी खूप आनंदी आहे.” यासह उर्फीने गुलाब आणि हार्ट इमोटिकॉन देखील टाकले आहेत.

उर्फीला ‘बिग बॉस ओटीटी’ मधून मिळाली ओळख
सोशल मीडिया सेन्सेशन बनलेल्या उर्फी जावेदने 2016 मध्ये ‘बडे भैया की दुल्हनिया’ या टीव्ही मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अनेक टीव्ही शोचा भाग असलेल्या उर्फीला ‘बिग बॉस ओटीटी’ मधून ओळख मिळाली.(tv actre`s`s urfi javed poses with javed akhtar uorfi javed sets joke finally met my grandfather)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्याने नवीन वर्षात केला चांगला संकल्प; मुलासाठी सोडली ‘ही’ वाईट सवय
‘घोडे पे सवार’ गाण्यावर थिरकताच अभिनेत्री ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘अगं किती मोठे ओठ’

हे देखील वाचा