टेलिव्हिजनवरील प्रसिद्धी पिपासू अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत असते. उर्फीच्या या स्टाईलला कधी पसंती मिळते, तर कधी तिला नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कधीकधी तिला तिच्या ड्रेसमुळे अनेक अडचणींचाही सामना करावा लागतो. अशातच तिने तिचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने फॅशनच्या नादात स्वत:ला दुखापत करून घेतली आहे. त्यामुळे चाहतेही प्रश्नांचा भडिमार करत आहेत.
उर्फीला झालंय तरी काय?
झाले असे की, उर्फी जावेद (Urfi Javed) हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने साखळ्यांनी तयार केलेला टॉप आणि काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. उर्फीचा हा लूक तेव्हा चांगलाच चर्चेत राहिला होता. आता उर्फीने सांगितले आहे की, तिला हा आऊटफिट परिधान केल्यानंतर दुखापत झाली होती. फोटोमध्ये दिसते की, साखळ्यांमुळे तिच्या मानेवर दुखापत झाली आहे.
हा फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, “थ्रोबॅक! उजव्या बाजूला स्वाईप करून पाहा की, आऊटफिट परिधान केल्यानंतर काय होते.” ही पोस्ट पाहून चाहते तिची प्रशंसा करत आहेत, तर काहींना ही पोस्ट आवडली नाहीये. अनेकांनी असे म्हटले आहे की, तिने असे कपडे का घातले आहेत.
http://https://www.instagram.com/p/Cffy_TlrXTl/?utm_source=ig_web_copy_link
एका युजरने लिहिले आहे की, “तू खूप मेहनतीने हे काम करते.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “तू स्वत:लाच दुखापत करून घेतलीस.” तसेच, आणखी एकाने लिहिले की, “तुझ्यासारखं कुणीच असू शकत नव्हतं.”
नुकतेच उर्फी हिचे नाव आशियातील सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या कलाकारांच्या यादीत सामील झाले होते. विशेष म्हणजे, या यादीत कियारा आडवाणी, कंगना रणौत, क्रिती सेनन यांसारख्या अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना तिने सोडले होते. या यादीत उर्फी ५७व्या क्रमांकावर होती.
सोळाव्या वर्षी ‘त्या’ एका गाण्याने खळबळ माजवणारी ‘शर्ली’ आज झालीये सत्तावीस वर्षांची
खतरों के खिलाडी १२ : शिवांगी जोशीला सोडले मगरीच्या पिंजऱ्यात, भितीने अभिनेत्रीची झाली ‘अशी’ अवस्था