Thursday, June 12, 2025
Home टेलिव्हिजन Oops! पॅपराझीच्या प्रश्नावर काय बाेलून गेली उर्फी, पाहा व्हिडिओ

Oops! पॅपराझीच्या प्रश्नावर काय बाेलून गेली उर्फी, पाहा व्हिडिओ

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आजकाल सतत गोंधळ घालताना दिसत आहे. उर्फी कधी तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे तर कधी तिच्या आउटफिट्समुळे चर्चेत असते. अशातच आता उर्फीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती ग्रे कलरच्या शॉर्ट स्कर्ट आणि बॅकलेस टॉपमध्ये दिसत आहे. यादरम्यान पहिल्यांदाच तिने एका पॅपराझींच्या प्रश्नावर विचित्र प्रतिक्रिया दिली आहे, ज्यानंतर तिने दिलेली उत्तरे ऐकून सगळेच हैराण झाले आहे.

उर्फी (urfi javed) नेहमीच तिच्या अतरंगी आउटफिट्समुळे चर्चेत असते, ज्यामुळे ती अनेकदा वादाच्या घेऱ्यात सापडते. उर्फीवर जेव्हा प्रश्न उपस्थित केले जातात, तेव्हा ती कुठलाही विचार न करता स्पष्टपणे उत्तर देते. उर्फीची अशीच बेधडक शैली नुकतीच विमानतळावर पाहायला मिळाली. आता तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यावर चाहते भिन्नभिन्न कमेंट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

उर्फीच्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ती विमानतळाच्या दिशेने जाताना दिसत आहे. जेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका पॅपराझीने तिला विचारले की, “उर्फी मॅडम प्रत्येकजण तुमच्यावर खूप प्रेम करतो, यावर तुम्हाला चाहत्यांना काय सांगायचे आहे?” तेव्हा उर्फीने विचित्र एक्सप्रेशन्स दिले आणि यानंतर ती म्हणाली, “प्यार का तो पता नहीं लेकिन मेरा ** डान्स जारी रहेगा.” हे ऐकून पापाराझींचे कान टवकारले. यानंतर उर्फी हसायला लागली. यावर मागून एका फोटोग्राफरने सांगितले की, “तुमच्याप्रती आमच्या ह्रदयात खूप प्रेम आहे.” यावर उर्फी ‘धन्यवाद’ म्हणत निघून गेली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी विषयी बाेलायचे झाले, तर उर्फी सध्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासाेबतच्या वादामुळे चर्चेत आहे.(tv actress urfi javed shocking answer over question related to fans love video going viral )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हही वाचा-
उर्फीला भगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये पाहूण संतापले युजर्स; म्हणाले, ‘अटेंशन मिळवण्यासाठी…’

बोल्ड अभिनेत्रीचा सोज्वळ अंदाज आला समोर, फोटो पाहून पडाल प्रेमात

हे देखील वाचा