Saturday, July 6, 2024

शितल म्हात्रे प्रकरणात उर्फीने घेतली उडी, खाेचक शब्दात ट्विट करत म्हणाली…

शिवसेना (शिंदे गटाच्या) नेत्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात साेशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेदने उडी घेतली आहे. चित्रा वाघ यांच्यावर टिका करत उर्फीने खाेचक शब्दात ट्विट केले आहे, ज्यामुळे उर्फी आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातील जुलगबंदी पुन्हा पाहायला मिळणार आहे.

शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात चित्रा वाघ यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांना लढण्याचा सल्ला दिला आहे. भाजप नेत्या म्हणतात की, “शितल…..तू लढ आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत हा विषय फक्त शितल पुरता मर्यादीत नाहीचं राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील मुंबईपाेलिसांनाआवाहन आहे या हरामखोरांना सोडू नकाचं पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या या व्हिडिओवर उर्फीने रीट्वीट करत म्हणते की, “ज्यावेळी माझ्या कपड्यांवरुन ही महिला माझ्या चरित्र्यावर बोट दाखवत होती ते विसरली. मला तुरुंगामध्ये टाका अशी मागणी करत होती. सर्वांसमाेर माझं डोकं फोडण्याची धमकी देत होती. वाह वाह वाह वाह… हिपोक्रॅसीची पण काहीतरी मर्यादा आहे हे या स्त्रीला कोणीतरी सांगा.”

उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी काही दिवसांपुर्वी तिच्यावर सडकून टीका केली होती. त्याचसोबत सार्वजनिक ठिकाणी अशा कपड्यांमध्ये दिसल्यास परिणाम भोगावे लागतील असा खाेचक इशाराही तिला दिला होता, ज्यानंतर उर्फीने ही चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती, ज्यामुळे सोशल मीडियावर या दोघींची चांगलीच जुलगबंदी पाहायला मिळाली होती. अशात आता शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रेच्या व्हायरल व्हिडीओ निमित्ताने पुन्हा एकदा उर्फीने चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.(tv actress urfi javed slams bjp leader chitra wagh on sheetal mhatre morph video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नवऱ्यालाच शिकव म्हणजे झालं….,’ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा सून शिवानी रांगोळे हिला मजेशीर सल्ला

बिग बॉस १६मध्ये तुफान गाजलेल्या अंकित गुप्ता आणि प्रियांका चौधरी यांनी बांधली लगीनगाठ? व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा