Tuesday, August 5, 2025
Home बॉलीवूड काय सांगता! उर्फी जावेदने सद्गुरूंवर केली टीका; कमेंट करत म्हणाली, ‘छाेटे विचार…’

काय सांगता! उर्फी जावेदने सद्गुरूंवर केली टीका; कमेंट करत म्हणाली, ‘छाेटे विचार…’

काही कलाकार असे असतात, जे रुपेरी पडद्यावर न झळकताच तुफान चर्चेत असतात. या कलाकारांमध्ये उर्फी जावेद हे नाव घेतले जाणार नाही, असे होणार नाही. उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळे सर्वांचे लक्ष वेधते. तिची फॅशन पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते, तर काहींना तिचा लूक आवडतो. मात्र, यावेळी उर्फी तिच्या फॅशनसेन्समुळे नाही, तर सद्गुरुंवर केलेल्या टिकेमुळे चर्चेत आली आहे.

उर्फी (urfi javed) हिने एलजीबीटीक्यू समुदायावर कमेंट करत असतानाचा कार्यकर्ते आणि आध्यात्मिक सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याद्वारे तिने सद्गुरूंवर निशाना साधला आहे.

urfi-javed
Photo Courtesy Instagramurf7i

उर्फी नेहमीच एलजीबीटीक्यू समुदायाच्या बाजूने बोलत आली आहे. अशात नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरींवर सद्गुरूंच्या भाषणाचा निषेध करत त्याला प्रोपेगेंडा म्हटले आहे. पहिल्या स्टाेरीत, तिने सद्गुरूंच्या भाषणाची एक छोटी क्लिप पोस्ट केली, ज्यामध्ये ते एलजीबीटीक्यू समुदायावर कमेंट करताना दिसतात. ज्यात ते म्हणाले की, “ही ‘मोहिम’ थांबवण्याची गरज आहे.” कॅप्शनमध्ये उर्फीने लिहिले, “जो कोणी त्याला फॉलो करतो, त्याने कृपया मला अनफॉलो करा. एलजीबीटीक्यू समुदाय इतका लहान नाही, परंतु त्यांच्या बुद्धिमत्तेची कल्पना करा.”

urfi-javed
Photo Courtesy Instagramurf7i

पुढच्या इंस्टाग्राम स्टाेरीत, उर्फी जावेदने एलजीबीटीक्यू समुदायाबद्दल तिची भूमिका स्पष्ट केली, त्याच विषयावर लिहित ती म्हणाली की, “अशा प्रकारच्या प्रचाराला प्रोत्साहन देऊ नये. एलजीबीटीक्यू समुदायाला आपल्या समर्थनाची गरज आहे. शतकानुशतके लोकांना त्यांचे… लपविण्यास भाग पाडले गेले. आपल्याला प्रचार करायला हवा. की, आम्ही जसे काही आहाेत असेच आहाेत. काहीही फरक पडत नाही तुम्ही काेणावर प्रेम करता. तुम्हाला स्विकारले गेले पाहिजे.

आठवडाभरापूर्वी रॅपर हनी सिंगने एका मुलाखतीत म्हटले होते की, “देशातील सर्व मुलींनी उर्फीप्रमाणे धाडसी व्हायला शिकले पाहिजे.” उर्फी नुकतीच सनी लिओनी आणि अर्जुन बिजलानी यांनी होस्ट केलेल्या ‘स्प्लिट्सविला X4’ या डेटिंग रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. (tv actre`s`s urfi javed slams sadhguru for his views on lgbtq people calls his brain small)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘साेपे नव्हते लिसा यांचे आयुष्य’, शाेकात बुडालेल्या सेलिब्रिटींनी गायिकेला वाहिली श्रद्धांजली
रवीना टंडनची खतरनाक स्टाईल! पत्नीला चुकीच्या नावाने हाक मारणाऱ्या नवऱ्यांना इशारा

हे देखील वाचा