सध्या टीव्ही विश्वात खळबळ उडाली आहे. ‘ससुराल सिमर का‘ फेम वैशाली ठक्कर हिच्या आत्महत्येच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. वैशालीने अचानक हे पाऊल कसे उचलले हे तिच्या जवळच्या लोकांना समजू शकलेले नाही. दुसरीकडे, वैशालीच्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ती एका मजेदार व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तिने मृत्यूबाबत इशारा दिल्याचे समजते.
वैशाली ठक्कर (Vaishali Takkar) हिने 5 दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या मजेशीर व्हिडिओमध्ये ती ‘दिल जिगर नजर क्या है, मैं तो तेरे लिए जान भी दे दूं’ गाताना दिसली. या व्हिडिओवर चाहत्यांचा फार प्रतिसाद मिळाला.
वैशालीशी प्रेमात झाली फसवणूक ?
इन्स्टाग्रामवर वैशालीचा हा मजेदार व्हिडिओ पाहून तिच्या ओळखीचे आणि चाहते खूप हसले. पण वैशाली मनातल्या मनात वेदना घेऊन सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करत होती हे कुणालाच माहीत नव्हतं. या व्हिडीओमध्ये वैशालीही मरण्याची क्रिया करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत वैशालीने आयुष्य संपवण्याचा निर्णय फार पूर्वीच घेतल्याचे समजते. त्याचवेळी, प्रेमात तिला फसवण्यात आल्याचेही बोलले जात आहे आणि त्यामुळेच तिने हा व्हिडिओ फनी स्टाइलमध्ये अपलोड केला आहे.
View this post on Instagram
वैशाली गेल्या वर्षभरापासून इंदूरमध्ये राहत होती आणि आज तिचा मृतदेह तिच्या घरातून सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना तिच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडली असून, त्याचा तपास सुरू आहे. तिच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.
वैशालीने ‘ये वादा रहा’, ‘ये है आशिकी’, ‘ससुराल सिमर का’, ‘सुपर सिस्टर’, ‘लाल इश्क’ या दमदार मालिकामध्ये दिसली हाेती. वैशाली शेवटची 2019च्या ‘मनमोहिनी’ शोमध्ये देखील दिसली होती. वैशालीने टीव्हीशिवाय चित्रपटांमध्येही काम केले आहे. वैशाली ही मूळची उज्जैनमधील महिदपूरची आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘मिसमॅच्ड’ फेम रोहित सराफच्या मागे धावल्या मुली, चाहत्यांपासून जीव वाचवत कलाकारांनी ठाेकली धूम
तुषार बघायचा करीनाची 12-14 तास वाट, स्टारकिड असूनही केले हाेते दुर्लक्षित