हिंदी चित्रपट किंवा मालिका क्षेत्रातील अभिनेत्री आपल्या रिल लाइफमध्ये जितक्या कौटुंबिक भूमिका साकारताना जपताना दिसतात प्रत्यक्षात मात्र त्यांच्या आयुष्यात अनेक वाद सुरू असतात. हिंदी मालिका क्षेत्रात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी येऊन त्यांचे घटस्फोट झाले आहेत मात्र तरीही त्या हिमतीने आपल्या करियरमध्ये यशाच्या शिखरावर गेल्या आहेत आज पाहूया अशाच काही अभिनेत्री.
हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि त्यांचे ऐश्वर्य प्रत्येकाला खुणावत असते. मात्र या क्षेत्रात नाती, लग्न जितके पटकन जुळतात तितक्याच लवकर ते दूरसुद्धा होतात. म्हणूनच या क्षेत्रात अनेक अभिनेत्री घटस्फोटीत आहेत मात्र तरीही त्या या क्षेत्रात टिकून आहेत. कोण आहेत या अभिनेत्री पाहूया.
रश्मी देसाई – बिग बॉसच्या 13 व्या पर्वात रश्मी देसाई चांगलीच चर्चेत आली होती. या आधी ती ‘उत्तरन’ मालिकेतून तपस्याच्या भूमिकेत झळकली होती. यामध्ये तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच काळात रश्मी आणि नंदीश संधू यांच्यात जवळीक निर्माण झाली. दोघांनी लग्न केले मात्र त्यांचा हा विवाह फार काळ टिकू शकला नाही. त्यांनी घटस्फोट घेतला मात्र आजही रश्मी अभिनय क्षेत्रात लोकप्रिय आहे.
श्वेता तिवारी – ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेतील प्रेरणाच्या भूमिकेने श्वेता तिवारीला घराघरात ओळख मिळवून दिली. आपल्या अभिनयात लोकप्रिय असलेल्या श्वेताचे खासगी आयुष्य मात्र फार संकटांचे राहिले आहे. तिने सगळ्यात आधी राज चौधरीसोबत विवाह केला होता मात्र त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही. राज चौधरी सोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिने अभिनव कोहलीसोबत संसार थाटला मात्र हे सुद्धा नाते टिकले नाही त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सध्या ती आपल्या दोन मुलांसोबत राहत असून अभिनय क्षेत्रात नाव कमवत आहे.
वाहबीज दोराबजी – ‘प्यार की ये एक कहाणी’ मालिकेत वाहबीजने भूमिका साकारली होती. याच काळात तिने अभिनेता विवियन डिसेनासोबत विवाह केला. मात्र लग्नाच्या तीनच वर्षात त्यांना घटस्फोट घ्यावा लागला. वाहबीज आज यशस्वी कलाकार म्हणून काम करत आहे.
स्नेहा वाघ – ‘वीरा :एक वीर अरदास’ मालिकेत स्नेहाने जबरदस्त भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. याच काळात तिने अभिनेता आविष्कार दार्वेकरसोबत लग्न केले मात्र हे नाते फार काळ टिकू शकले नाही. यानंतर स्नेहाने अनुराग सोलंकीला डेट केले होते.
दिलजीत कौर -‘ इस प्यार को क्या नाम दू’ मालिकेतील अंजलीच्या भूमिकेने दिलजीतला सगळीकडे प्रसिद्धी मिळाली होती. याचबरोबर ती बिग बॉस 13 मध्येही सहभागी झाली होती. तिने शालीन भनोटसोबत विवाह केला होता. मात्र त्यांच्या नात्यात सतत वाद होऊ लागले. दिलजीतने आपल्या पतीवर मारहाणीचे ही आरोप केले होते. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सध्या दिलजीत आपल्या अभिनय करियरमध्ये यशाच्या शिखरावर आहे.
जेनिफर विंगेट – मालिका क्षेत्रातील लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्री अशी जेनिफरची ओळख आहे. अनेक लोकप्रिय कार्यक्रमात तिने काम केले आहे. ‘दिल मिल गये’ मालिकेत तिच्यात आणि करण ग्रोवरमध्ये जवळीक निर्माण झाली त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता मात्र हे नाते फार काळ टिकले नाही. जेनिफरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करणने बिपाशासोबत लग्न करून संसार थाटला.
हेही वाचा :
- जॅकलीन फर्नांडिसच्या नव्या गाण्याने लावले चाहत्यांना वेड, ‘मूड मूड के’ गाणे चाहत्यांच्या भेटीला
- ‘या’ जर्मन अभिनेत्रीने गाजवले बॉलिवूड, चित्रपटातून मिळाली लोकप्रियता
- अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने सांगितला दीपिका सोबतच्या किसिंग सीनचा भन्नाट किस्सा, म्हणाला…