Monday, July 1, 2024

पुनीतच्या निधनाची बातमी सांगताना, थेट प्रक्षेपणातच फुटला अँकरच्या अश्रूंचा बांध; पाहून पाणावतील तुमचेही डोळे

कन्नड चित्रपटांचा सुपरस्टार पुनीत राजकुमारच्या निधनाच्या बातमीवर अद्याप कोणाचाही विश्वास बसत नाहीये. वयाच्या ४६ व्या वर्षी पुनीत असा निघून जाईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. पुनीत हा फिटनेससाठी खूप सिरीयस होता. व्यायाम करतानाच त्याला छातीत दुखू लागलं होतं. यानंतर त्याला तत्काळ बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. पुनीतच्या अशा जाण्याने सर्वांच्याच मनाला त्रास होत आहे.

लाईव्ह टेलिकास्टमध्येच रडू लागली अँकर
चाहत्यांना हे मान्य करणं कठीण जात आहे. अशातच, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक टीव्ही अँकर स्वतःला रोखू शकली नाही आणि अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी सांगता सांगताच तिला रडू कोसळलं. त्यावेळी तिचे सहकारी कर्मचारी तिला सावरत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (tv anchor of kannada news channel broke down while reading news of actor puneeth rajkumar demise video viral)

टीव्ही अँकर आपल्या सर्व भावनांवर नियंत्रण ठेवून बातम्या लोकांपर्यंत पोहोचवतात. पण कन्नड न्यूज चॅनलच्या अँकरला तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही. अप्पूच्या मृत्यूची बातमी सांगताना अश्रू अनावर झाल्याने, ती धाय मोकलून रडू लागली. अशा परिस्थितीत तिच्या सहकारी कर्मचाऱ्याने तिला सावरलं. हा व्हिडिओ चाहत्यांच्या आयुष्यातील पुनीत राजकुमारची जागा दाखवून देतो.

दुसरीकडे, अभिनेत्याचे पार्थिव बंगळुरू येथील कांतीरवा स्टेडियममध्ये ठेवण्यात आले असून, तेथे त्याच्या अंत्यदर्शनासाठी चाहते मोठ्या संख्येने पोहोचले आहेत. पुनीतच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वृत्तानुसार, त्याची मुलगी परतल्यानंतरच अभिनेत्याचे अंतिम संस्कार केले जातील.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पुनीतचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी, कर्नाटक सरकारला घ्यावा लागला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

-कौतुकास्पद! केले गेले पुनीत राजकुमारचे नेत्रदान, वडिलांनी काही वर्षांपूर्वी आख्या कुटुंबासाठी घेतला होता ‘हा’ निर्णय

-कन्नड सुपरस्टार राजकुमार यांचा मुलगा होता पुनीत; वीरप्पनने केले होते त्याच्या वडिलांचे अपहरण

हे देखील वाचा