टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर कायम सक्रिय राहते. अंकिता तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याची कोणतीही संधी सोडत नाही. चाहत्यांना तिच्या आयुष्याबद्दल अपडेट देण्यासाठी, ती सतत व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस अवतारात दिसली आहे. अंकिताचा नवीन लूक तिच्या चाहत्यांकडून खूप पसंत केला जात आहे. या फोटोमध्ये अंकिता लोखंडेने ब्लॅक एँड व्हाईट ड्रेस परिधान केला आहे. यात ती पहिल्यांदाच शॉर्ट हेअर स्टाईलमध्ये दिसली आहे. अंकिताचा हा लूक अगदी निराळा दिसत आहे.
हे ग्लॅमरस फोटो अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी तुला पाहू शकते.”
युजर्ससोबतच कलाकारही तिच्या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुकही करत आहेत. अभिनेत्री रश्मी देसाईने तिच्या फोटोवर इमोजी कमेंट केले आहेत. एका युजरने ‘खूप सुंदर’ अशी कमेंट केली आहे. अंकितामध्ये बोल्डनेस सोबतच ग्लॅमरस ही आहे. त्यामुळे तिचा प्रत्येक लूक चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जातो.
अंकिताने झी टीव्हीवरील ‘पवित्रा रिश्ता’ या मालिकेत ‘अर्चना’ची भूमिका साकारून बरीच प्रसिद्धी मिळवली. सन २०१८ मध्ये तिने चित्रपटात काम करण्यासाठी टीव्ही जगातून निवृत्ती घेतली, तेव्हा ती सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक होती. २०१९ मध्ये अंकिताने तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या ऐतिहासिक चित्रपटातून केली. यात ती ‘झलकरीबाई’ या सहाय्यक भूमिकेत दिसली होती. त्यानंतर ती २०२० मध्ये आलेल्या ‘बागी 3’ मध्ये दिसली, ज्याचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-समंथा अक्किनेनीने शेअर केला बोल्ड लूक; पाहा हिरव्या- सोनेरी गाऊनमधील ग्लॅमरस अभिनेत्रीची हॉटनेस
-सलमान-अक्षयबरोबर काम केलेल्या अभिनेत्रीचे बिकीनवरील फोटो-व्हिडीओ व्हायरल, तुम्हीही टाका एक नजर