इंडियन आयडल फेम अरुणिता कांजीलालने पवनदीप राजनसोबत काम करण्यास दिला नकार, जाणून घ्या कारण


‘इंडियन आयडल सीझन १२’मध्ये अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) आणि पवनदीप राजन (Pavandeep Rajan) हे सर्वात चर्चित स्पर्धक होते. या जोडीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘इंडियन आयडल’ संपल्यानंतर या दोघांना सोबत काम करण्याच्या अनेक ऑफर मिळाल्या. हे दोघे एका म्युझिक व्हिडिओमध्येही एकत्र दिसले होते. परंतु आता अरुणिताने पवनदीपसोबत काम करण्यास नकार दिला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर पवनदीप आणि अरुणिता यांच्या चाहत्यांनी निराशा व्यक्त केली आहे.

त्यांच्या या आगामी म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन राज सुरानी करणार होते. त्यांनी याआधी या दोघांना घेऊन ‘मंजूर दिल ‘हे गाणे ही दिग्दर्शित केले होते. पवनदीप आणि अरुणिता त्यांच्यामध्ये काही आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अरुणिताचे आई वडील इंडियन आयडलमध्ये दाखवलेल्या तिच्या लव्ह ट्रॅकवर खुश नव्हते. जेव्हा राज सुरानी यांनी या दोघांसोबत तीन म्युझिक व्हिडिओसाठी करार केला होता. त्यानंतरही अरुणिताच्या वडिलांनी स्पष्ट केले होते की व्हिडिओमध्ये रोमँटिक दृश्य असू नयेत.

arunita and pawandeep
arunita and pawandeep

अरुणिता बरोबर सेटवर जाण्यासाठी एक व्यक्तीची नेमणूक करण्यात आली होती तिच्या वडिलांनी अधिक हस्तक्षेप केल्यानंतर अरुणिताने हा म्युझिक व्हिडिओ सोडल्याचा अंदाज बांधला जात आहे. एका मुलाखतीत राज सुरानी म्हणाले की, “अरुणिताला म्युझिक व्हिडिओमध्ये राहायचे नव्हते असे काही नव्हते. जर तिला परफॉर्म करण्याची गरज नसेल तर ती परदेशात शो का करेल? मला वाटतं म्युझिक व्हिडिओमध्ये काम न करण्याचा कुटुंबाचा निर्णय होता मी खरतर निराश झालो आहे. अरुणिताला अभिनयात फारसा रस नाही आणि तिला केवळ तिच्या गाण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे.” अरुणिताच्या आईच्या हस्तक्षेपाच्या प्रश्नावर ते म्हणाले, “या सगळ्याशी इथे काही संबंध नाही. अरुणिताला अभिनयात रस नाही आणि तिला फक्त गाण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे कंपनीला त्यांच्याकडून हव्या असलेल्या अभिनयामुळे अरुणितासाठी तणाव निर्माण होत होता म्हणून तिने हा निर्णय घेतला आहे.”

arunita and pawandeep
arunita and pawandeep

मात्र कारण काहीही असो पवनदीप आणि अरुणिता इंडियन आयडलच्या १२ व्या पर्वात झळकल्यानंतर सुपरहिट झाले होते. प्रेक्षकांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडली होती. त्याचे चाहते त्यांच्या म्युझिक व्हिडिओची उत्सुकतेने वाट पाहत होते आणि आता ते एकत्रित काम करणार नाही हे समजल्यावर ते खूप निराश झाले आहेत.

हेही नक्की वाचा –


Latest Post

error: Content is protected !!