Wednesday, July 3, 2024

‘काटा लगा गर्ल’ शेफालीने वयाच्या चाळीशीत बिकिनी घालून केला कहर, एकदा पाहाच फाेटाे

‘काटा लगा’ या गाण्याने प्रसिद्ध झालेली शेफाली जरीवालाने तिचे लेटेस्ट बाेल्ड फाेटाे इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती बीचवर बसून बोल्ड पोज देताना दिसत आहे. विशेष म्हणजे तिने गुलाबी रंगाची आणि लाल रंगाची स्टायलिश 2 पीस बिकिनी घातली आहे, ज्याती ती वाळूवर बसून वेगवेगळ्या प्रकारे पोज देताना दिसत आहे. यासाेबत तिने खुले केस साेडले आहेत आणि हलके मेकअपही केले आहे, ज्यात ती खुप सुंदर दिसत आहे.

फोटो शेअर करताना शेफाली जरीवाला (shefali jariwala) हिने लिहिले, ‘फीलिंग सॅंडी। बीच डे।’ याशिवाय तिने अनेक हॅशटॅगही वापरले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहेत आणि त्याला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. चाहेत तिच्या या फाेटाेंवर कमेंट करत ‘सुंदर’, ‘सुंदर पिक्चर’, ‘सो हॉट’, ‘चाहती क्या हो’ अशा भन्नाट कमेंट करत आहेत.

शेफाली जरीवाला बिग बॉसमध्ये दिसली हाेती. यामध्ये तिचे अनेकांशी भांडण झाले. बिग बॉसची स्पर्धक म्हणून तिने खूप प्रसिद्धी मिळवली. तिने बिग बॉसच्या घरात काही आठवडे घालवले. या व्यतिरिक्त शेफाली जरीवालाने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे. तिचे गाणी प्रेक्षकांना चांगलीच आवडतात. तिने अनेक चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यासाेबतच ती अनेक प्रोजेक्ट्समध्येही दिसणार आहे.

शेफाली जरीवालाचा चाहता वर्ग खूप माेठा असून तिचा फॅशन सेन्स चाहत्यांना खूप आवडताे. तिने अनेक कलाकारांसोबत काम केले असून ती अनेक शोमध्ये जज म्हणूनही दिसली आहे. ती अनेकदा तिच्या चाहत्यांशी संवाद साधत साेशल मीडियावर भन्नाट फाेटाे शेअर करते.(tv bigg boss ex contestant kanta laga fame shefali jariwala bold photos in 2 piece colorful bikini at the age of 40 goes viral)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
हॅपी मंकरसंक्रात! अमृता फडणवीसांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद, पाहा भन्नाट व्हिडिओ

“खोटे गोड बोलण्यापेक्षा कडू सत्य बोला”; केतकीनं चाहत्यांना दिल्या काटेरी शुभेच्छा

हे देखील वाचा