Saturday, July 6, 2024

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात ‘बाप्पा’ झाले विराजमान, राकेश बापटने घडवली मूर्ती

सध्या ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो खूप चर्चेत आहे. बिग बॉसच्या या घरात नेहमी काही ना काही घडत असतं. ‘बिग बॉस ओटीटी’ च्या ताज्या भागाची सुरुवात नेहमीप्रमाणे एका गाण्याने झाली. घरातील सर्व स्पर्धक नाचताना दिसले. यानंतर नेहा भसीन आणि निशांत भट्ट राकेश बापट बद्दल बोलताना दिसले. नेहा म्हणते की, राकेशचं मत कधी स्पष्ट नसतं. त्याची मैत्री आणि प्राधान्ये खूपच अस्पष्ट आहेत. पुढे निशांतही म्हणतो की, राकेश गोंधळलेला आहे. त्याचवेळी दिव्या निशांतला म्हणते की, नेहा आग लावणार आहे. यानंतर दिव्या अग्रवाल आणि शमिता शेट्टी यांच्यात थोडा वाद झाला.

नंतर, प्रतीक सहजपाल राकेशबद्दल शमिताला टोमणा मारतो आणि म्हणतो की, प्रेम संपले. शमिता म्हणते की, हे प्रेम नाही. तो तिला आवडतो. प्रेम इतक्या लवकर होत नाही. प्रतीक शमिताला सहमती दर्शवतो. मूस जट्टाना निशांतला विचारते की, ती प्रतीकशी कशाबद्दल बोलली? तो म्हणतो की, “तिने प्रतीक आणि तुझ्यासोबत ते सोडवायला सांगितले आहे. पण तुम्ही दोघे एकमेकांना आवडता. यावरून नेहा आणि प्रतीकमध्ये भांडणे सुरू होतात. (tv bigg boss ott written update ganpati idol established in the house moose pratik come to close again)

यानंतर, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सर्वजण राकेशने बनवलेल्या मूर्तीची पूजा करतात. सर्वजण आरती म्हणतात तर शमिता आरती करते. याच दरम्यान मूसच्या घरून पत्र येते आणि ती ते पत्र वाचून भावूक होते. तेव्हा शमिता तिला मिठी मारते आणि तिचे सांत्वन करते. मूसला रडताना पाहून प्रतिकही येतो आणि तिला समजावतो. पण मूस अजूनच रडायला लागते. निशांत यावर आपलं मत व्यक्त करतो, तेव्हा मूस त्याला शिवीगाळ करते. मूस प्रतिकला मिठी मारते आणि निशांत हसतो.

त्यानंतर बिग बॉस स्पर्धकांना टास्क देतात. यामध्ये दोन टीम तयार केल्या जातात. पहिली टीम ‘ए’ मध्ये निशांत, दिव्या आणि मूस आहेत. तर दुसरी टीम ‘बी’ मध्ये राकेश, प्रतीक आणि नेहा यांचा समावेश आहे. शमिता कर्णधार आहे. या टास्कमध्ये दोन्ही संघांना भारतीच्या १० डिशची चाचणी करायची आहे. यानंतर स्पर्धकांना त्या डिशशी संबंधित योग्य नाव बोर्डवर लिहायचे होते. मूस आणि राकेश हे टास्क सुरू करतात.

पुढे घरात लक्झरी बजेटचे चॅलेंज येते. टीम ‘ए’ मध्ये प्रतीक, निशांत आणि मूस यांचा समावेश आहे आणि टीम ‘बी’ मध्ये राकेश, शमिता आणि दिव्या यांचा समावेश आहे. तर तेव्हा नेहा कर्णधार बनते. या टास्कमध्ये जो बाहेर ठेवलेली जास्तीत जास्त हाडे गोळा करेल, तो विजेता असेल. टास्क सुरू होते. नेहाने टीम ‘बी’ ला विजेता सांगते. बिग बॉस रात्री रिपोर्ट कार्ड देतात आणि सांगतात की प्रेक्षक त्यांच्या कामगिरीवर खूश आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मामा-भाच्याचे नातं इतकं कसं बिघडलं? जाणून घ्या कृष्णा अभिषेक आणि गोविंदामधील वादाच कारण

-पहिलीपासून लपून दुसऱ्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी ‘दबंग खान’ने चक्क बदलले होते स्वतःचे दात; मजेदार आहे तो किस्सा

-काय सांगताय! बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला ‘या’ गोष्टीची वाटतेय भीती, करण जोहरने केला खुलासा

हे देखील वाचा