Tuesday, July 9, 2024

कॉमेडियन सुगंधा मिश्राच्या वाढदिवसानिमित्त पती संकेत भोसलेने दिल्या हटके शुभेच्छा! पाहा तिने केलेली लक्षवेधी कमेंट

आपल्या प्रतिभेने प्रेक्षकांची मने जिंकणारी कॉमेडियन सुगंधा मिश्रा, रविवारी (२३ मे) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या दरम्यान सुगंधाचा पती कॉमेडियन संकेत भोसले याने देखील तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा अतिशय खास पद्धतीने दिल्या आहेत. सुगंधा नुकतीच संकेत भोसलेसोबत विवाहबंधनात अडकली आहे. हा वाढदिवस खास बनवत, संकेतने आपल्या पत्नीसोबतचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

इंस्टाग्रामवर स्वतः चे आणि सुगंधा मिश्राचे काही फोटो पोस्ट करत संकेत भोसलेने लिहिले की, “माझ्या आयुष्याच्या दिग्दर्शकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझी पत्नी सुगंधा मिश्रा.” ही पोस्ट पाहून सुगंधा स्वत: ला रोखू शकली नाही आणि तिने लगेचच प्रतिक्रिया देत लिहिले, “धन्यवाद डॉक.” यासह तिने हार्ट इमोजीसुद्धा पोस्ट केला आहे. शेअर देताना दिसत आहे.

सुगंधा मिश्राची टीव्हीवर दीर्घ कारकीर्द राहिली आहे. २००८ मध्ये ती ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ मध्ये दिसली होती, ज्याने तिला बरीच ओळख मिळवून दिली. नंतर ती ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये विद्यावती (शिक्षक) च्या भूमिकेत दिसली, ज्यामुळे ती खूप प्रसिद्ध झाली. काही दिवसांपूर्वीपासून सुगंधा तिच्या लग्नाबद्दल खूप चर्चेत आहे. तिचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

तसेच, संकेत भोसलेही एक प्रसिद्ध विनोदकार आहे आणि तो टीव्हीवरही खूप लोकप्रिय आहे. तो नेहमी आपल्या मिमिक्रीने सर्वांना हसवतो. हे जोडपे अनेकदा त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात, जे बरेच व्हायरल होतात. तसेच, दोघांची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जॅकलिन फर्नांडिस योगा करताना ‘या’ गोंडस पार्टनरने दिली तिला साथ; पाहायला मिळाली मजेदार केमिस्ट्री!

-‘वरात घेऊन कधी येशील?’ म्हणत ‘शालू’ने केला व्हिडिओ शेअर; तर चाहत्यांच्या भन्नाट कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष

-काय दिवस आलेत! अभिनेत्री अनिता हसनंदानीने मारली पतीला कानाखाली; महिलांनाही सांगितली मॅजिक ट्रिक

हे देखील वाचा