Monday, October 27, 2025
Home बॉलीवूड मोठ्या मनाचा माणूस! स्पर्धकाची व्यथा ऐकून राघव जुयाल भावुक; करणार ‘इतक्या’ लाखांची मदत

मोठ्या मनाचा माणूस! स्पर्धकाची व्यथा ऐकून राघव जुयाल भावुक; करणार ‘इतक्या’ लाखांची मदत

प्रसिद्ध डान्सर आणि टीव्ही होस्ट राघव जुयालची प्रत्येक स्टाईल चाहत्यांना आकर्षित करते. स्टेजवरील डान्समुळे तो चाहत्यांना प्रचंड आवडतो. सध्या राघव रियॅलिटी शो ‘डान्स प्लस ६’ होस्ट करत आहे. कोरोनाच्या काळात त्याने उत्तराखंडच्या लोकांना खूप मदत केली. कठीण परिस्थितीत राघवने लोकांची सेवा अगदी मनापासून केली. तसेच अनेकदा रियॅलिटी शोच्या मंचावर वेगवेगळे स्पर्धक येतात. अलीकडेच, ‘डान्स प्लस ६’मध्ये स्पर्धकाचे दु:ख ऐकून, त्याने त्या स्पर्धकाला ८ लाख रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याचे वचन दिले आहे.

दरवेळी प्रमाणे यावेळीही डान्स रियॅलिटी शोमध्ये एकापेक्षा जास्त स्पर्धक आले आहेत. रियॅलिटी शोमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाची स्वत:ची वेगळी अशी कथा असते. रायपूर छत्तीसगड येथून एक स्पर्धक शोमध्ये उपस्थित झाला होता. त्या स्पर्धकाचे नाव एव्हन नागपुरे आहे. त्याने शोमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला. त्याला वाटते की, तो १० लाख रुपयांचे बक्षीस मिळवू शकले आणि आपल्या वडिलांवर असलेले कर्ज फेडू शकेल.

एव्हनच्या वडिलांना कोरोना झाला होता. त्यावेळी त्यांना ऑक्सिजनची कमतरता भासली आणि वेळेवर बेड न मिळाल्याने त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर घरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची झाली. तसेच घरातील सर्व जबाबदाऱ्या एव्हनच्या खांद्यावर आल्या आहेत. एव्हन बोलताना म्हणाला की, “मला डान्स करायला खूप आवडतो. त्यामुळे माझ्याकडे हा एकच पैसे कमवण्याचा मार्ग असल्याचे मी मनाशी पक्के केले आणि वडिलांवर असलेले कर्ज फेडण्यासाठी खूप मेहनत करण्यास सुरुवात केली.”

राघव एव्हनची ही कथा ऐकल्यानंतर भावूक झाला आणि एव्हनच्या वडिलांवर असलेल्या कर्जाची उर्वरित रक्कम स्वत: फेडण्याचे वचन दिले. एव्हन टीम पुनीत पाठकचा एक हिस्सा आहे. सध्या सोशल मीडियावर राघवच्या या कर्तव्याचे तोंड भरुन कौतुक केले जात आहे.

अनेकजण म्हणत आहेत की, “एकच ह्रदय तू किती वेळा जिंकणार आहेस.” अभिनेता सोनू सूद प्रमाणेच कोरोना ग्रस्तांना राघवनेही आर्थिक मदत केली आहे. तसेच दुर्गम भागात राहणाऱ्या गरीब लोकांनाही खूप मदत केली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राकेश मिश्राचे ‘हे’ गाणे रिलीझ; सोमेया पांडेसोबतच्या केमिस्ट्रीला मिळतेय चाहत्यांची पसंती

-राखी सावंतचा AAP नेते राघव चड्ढांना इशारा; म्हणाली, ‘माझ्या नावापासून दूर राहा, नाहीतर त्याचा…’

-‘विश्वातील सर्वात सुंदर मुलगी’, राजेश्वरी खरातच्या ग्लॅमरस अंदाजावर होतोय कौतुकाचा वर्षाव

हे देखील वाचा