Friday, June 13, 2025
Home टेलिव्हिजन स्पर्धकाची दुःखद कहाणी ऐकून भावूक झाला रेमो डिसूझा, उचललं ‘हे’ मोठ्ठं पाऊल

स्पर्धकाची दुःखद कहाणी ऐकून भावूक झाला रेमो डिसूझा, उचललं ‘हे’ मोठ्ठं पाऊल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाने (Remo Dsouza) आपल्या डान्सच्या जोरावर बॉलिवूडमध्ये चांगले स्थान निर्माण केले आहे. दिग्दर्शक म्हणूनही त्याने प्रत्येक वेळी स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर येत राहतात, जे येताच व्हायरल होतात. आज रेमोची इंडस्ट्रीत खास ओळख आहे. आपल्या उत्कृष्ट डान्स कौशल्याने चाहत्यांना प्रेरित करणारा रेमो सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तो अनेकदा त्याची प्रेमळ पत्नी लिझेलसोबत मजेदार रील व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. रेमो डिसूझा सध्या ‘डीआयडी लिटिल मास्टर सीझन ५’ या डान्स रियॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. शोच्या व्याप्तीच्या बाहेर जाऊन त्याने एका स्पर्धकाला मदत केली. आपल्या कामगिरीने सर्वांना थक्क करणाऱ्या ८ वर्षीय हिमांशूचे ऋण त्याने फेडले.

रेमो केवळ त्याच्या कामगिरीने प्रभावित झाला नाही, तर हिमांशूच्या आईने त्याच्या संगोपनासाठी किती त्रास सहन केला हे देखील त्याच्या हृदयाला स्पर्शून गेले. माध्यमांतील वृत्तानुसार, सेटवर रेमो खूप भावूक झाला होता. हिमांशू हा मूळचा दिल्लीचा असून, त्याने लहान वयातच वडील गमावले आणि त्याच्या आईनेच त्याचे संगोपन केले.

हिमांशूच्या आईने रिक्षा घेण्यासाठी घेतले कर्ज
हिमांशूच्या आईने तिच्या २ मुलांना सिंगल मदर म्हणून वाढवले. मुलांना वाढवण्यासाठी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आईने रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. मात्र, रिक्षा घेण्यासाठी त्यांना मोठे कर्ज घ्यावे लागले. रिक्षा चालवल्यामुळे अनेकदा लोक त्यांना रस्त्यावर त्रास देतात.

रेमोने स्पर्धक आणि त्यांच्या आईच्या अडचणी केल्या दूर
रेमोने त्यांच्या समस्या पाहिल्या आणि कर्ज फेडून त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. रेमो म्हणाला की, “तुम्ही तुमच्या रिक्षासाठी पैसे देत असलेला EMI द्या मला तुम्हाला मदत करायची आहे. रिक्षासाठी अजून किती रक्कम द्यावी लागेल ते सांगा. मी त्याला पैसे देईन.”

मौनी रॉय आणि सोनाली बेंद्रेसोबत रेमो डिसूझा ‘या’ शोचे करतोय परीक्षण
रेमो डिसूझा पुढे म्हणतो की, “तुम्ही किंवा हिमांशूने आता याबाबत टेन्शन घ्यावं असं मला वाटत नाही. आता रिक्षा तुमची, आता मुलांवर लक्ष केंद्रित करा आणि आनंदी जीवन जगा.” बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे, टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा या डान्स रियॅलिटी शोचे परीक्षण करत आहे.

हे देखील वाचा