कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. सध्या आपल्याकडे महाराष्ट्रामधील परिस्थिती अतिशय वाईट आहे. ऑक्सिजन अभावी अनेकांचे जीव जाताना दिसत आहेत. महाराष्ट्र शासनाने कडक लॉकडाऊनही जाहीर केले आहे. त्यामुळे अनेक कलाकारांनी स्वतःला आपल्या घरात कैद करून घेतले आहे. बाहेर परिस्थिती गंभीर असताना आपण चाहत्यांना कशाप्रकारे धीर देऊ शकतो याकडे काही कलाकारांचे लक्ष आहे. गौहर खान या अभिनेत्रीने असा एक व्हिडिओ शेयर केला आहे, जेणेकरून या गंभीर परिस्थितीत लोकांना थोडा विरंगुळा मिळेल. हा व्हिडिओ बघून प्रेक्षक खदखदून हसत आहेत.
व्हिडिओमध्ये गौहर खान हिजाब घातली दिसत आणि इफ्तारची वाट पाहत आहे. व्हिडिओमध्ये गौहर भुकेने व्याकूळ झाली आहे. तिच्या चेहेऱ्यावरील भावना या खूप मजेशीर दिसत आहेत. गौहरने व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, ‘माझ्या या व्हिडिओशी कोणा-कोणाचा संबंध आहे? हाहाहा..हा ट्रेंड रमजान २०२१ मध्ये करायला हवा. मजेदार आहे, परंतु सत्य आहे. तुमची अशी स्वत: ची आवडती गोष्ट कोणती आहे, ज्याने तुम्ही रोजा सोडतात, खजूर की पाणी?’
या व्हिडिओवर चाहते खूप प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. गौहरच्या या व्हिडिओवर प्रत्येकजण कौतुक करत आहे. युजरने कमेंट करत ‘तुमच्याइतकं क्यूट कोणी नाही,’ असं म्हटलंय. दुसऱ्या एका युजरने म्हटले की, ‘आपण हिजाबमध्ये खूप सुंदर दिसत आहात.’
गौहर खानच्या लग्नाच्या दोन महिन्यांनंतर तिचे वडील जफर अहमद खान यांचे निधन झाले. ते गेल्या काही काळापासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. याबद्दल गौहरने स्वत: सोशल मीडियावर सांगितले होते.
याव्यतिरिक्त धर्मेंद्र यांनीही कोरोनाच्या काळात वासराचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात त्यांनी लिहिले होते की, ‘या कठीण प्रसंगातही आपण असे आनंदी राहू शकतो.’
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘दारु कमी प्या, पण लोकांना मदत करा,’ पाहा अभिनेत्री राखी सावंतने कुणाला दिलाय ‘हा’ सल्ला
-‘देवाला प्रार्थना करा’, कोरोना काळात पीपीई किट घालून राखी सावंतचा नागरिकांना मोलाचा संदेश