अभिनेत्री नारायणी शास्त्रीने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतून घराघरात आपली ओळख निर्माण केली. ‘सास भी कभी बहु थी’ ही मालिका त्यावेळी खूप प्रसिद्ध होती. यामुळे नारायणी शास्त्रीलाही खूप प्रसिद्धी मिळाली. मागील आठवड्यात अभिनेत्रीने तिचा ४३ वा वाढदिवस साजरा केला. तिचा जन्म १६ एप्रिल, १९८७ रोजी पुण्यात झाला होता.
टीव्हीवर येण्यापूर्वी नारायणीने शासकीय लॉ कॉलेज मुंबई आणि सिम्बायोसिसमध्ये शिक्षण घेतले. अभिनेत्री म्हणून तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात २१ वर्षांपूर्वी, टीव्हीच्या ‘कहानी सात फेरों की’ या कार्यक्रमातून केली होती. आता ती ४३ वर्षांची झाली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरातील चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले. अलीकडेच अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आली आहे.
अभिनयासोबतच नारायणी तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत होती. तिने तिच्या परदेशी प्रियकर स्टीव्हन ग्रॅव्हरशी गुप्तपणे लग्न केले होते, ज्याच्याबद्दल तिने नंतर स्वतः खुलासा केला होता. स्टीव्हनपूर्वी नारायणीचे नाव टीव्ही अभिनेता गौरव चोप्राशी जोडले जायचे. असे म्हटले जाते की, दोघे बरीच वर्षे एकमेकांच्या जवळ होते. अनेक मालिकांमध्येही ते एकत्र दिसले आहेत.
माध्यमातील वृत्तानुसार, जेव्हा तिला गुप्तपणे केलेल्या लग्नाबद्दल विचारले गेले, तेव्हा अभिनेत्री म्हणाली, “माझ्या जवळच्या मित्रांना लग्नाबद्दल माहित होते.” याव्यतिरिक्त स्टीव्हन एक क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि फोटोग्राफर आहे. नारायणी अनेकदा इंस्टाग्रामवर पतीबरोबरचे फोटो शेअर करत असते.
काही काळापूर्वी ‘गंदी बात-५’ या वेब सीरिजमुळे ती चर्चेत आली होती. यात प्रेक्षकांना तिची बोल्ड स्टाईल पाहायला मिळाली. याशिवाय ती ‘पिया रंगरेज’, ‘पिया का घर’, ‘फिर सुबह होंगी’ यांसारख्या मालिकांमध्ये देखील दिसली आहे. नुकतेच, अभिनेत्रीने २ वर्षानंतर टीव्हीवर ‘आपकी नजरों ने समझा’द्वारे पुनरागमन केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-