Saturday, June 29, 2024

एक- दोन नव्हे, तर ऋतिक रोशन एका वेळेला खातो चक्क ८ समोसे! स्वतः च केला होता खुलासा

कॉमेडियन कपिल शर्माच्या शोचे चाहते देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत. कपिल शर्माने अथक परिश्रमांनी आपल्या चाहत्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. त्याचा हा शो दर आठवड्याच्या शेवटी लोकांना खूप हसवतो. या शोमध्ये कपिल शर्मा बॉलिवूडमधील कोणत्या ना कोणत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीला पाहुणे म्हणून बोलवत असतो.

शोमध्ये कपिल कलाकारांसोबत मस्ती मजा करताना दिसतो. याशिवाय गप्पा मारत, तो त्यांच्याकडून असे काहीतरी गुपित बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, जे प्रेक्षकांनी या अगोदर कधीच ऐकले नसेल. कपिल शर्मा शोच्या एका एपिसोडमध्ये ऋतिक रोशन आणि वाणी कपूर यांना बोलावले गेले होते. वास्तविक हा एपिसोड ‘वार’ या हिट चित्रपटादरम्यानचा आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफसुद्धा या दोघांसोबत होता.

सुरुवातीला कपिल शर्मा ऋतिक रोशन आणि वाणी कपूर यांचे शोमध्ये स्वागत करतो. यानंतर, तो त्यांच्यासोबत मस्ती मजा करायला सुरू करतो. यानंतर तो या दोन्ही पाहुण्यांना बसण्यासाठी सांगतो. पाहुण्यांच्या समोर सेंट्रल टेबलवर अनेक फळे ठेवलेली असतात. फळांविषयी कपिल म्हणतो की, “तसे तर नेहमी आम्ही बास्केटमध्ये इतकी फळे ठेवत नाहीत. मात्र, आज आम्ही यातील फळे वाढविली आहेत.”

यावर ऋतिक रोशन विचारतो की, “पण का?” कपिल म्हणतो, “आम्हाला माहित आहे की, तुम्ही जंक फूड वगैरे खात नाही.” यानंतर ऋतिक म्हणतो, “नाही, नाही, आता जाड होण्याची वेळ आली आहे. समोसे आणा, समोसे.” मग कपिल म्हणतो की, “समोसेही ऋतिक सर तुम्ही इतके- इतके खात असाल, नाही का?”

पुढे ऋतिक म्हणतो, “कसे आहे ना की, शिस्त फार कठीण असते. मी जेव्हा शिस्तीत राहतो, तेव्हा मी फार शिस्तबद्ध असतो. मात्र, जेव्हा मी शिस्तभंग करतो, तेव्हा मी काहीच नियम पाळत नाही. जेव्हा समोसे खाण्याची वेळ येते, तेव्हा मला एका, दोन, तीन, चारने काही नाही होत, तर किमान आठ तरी लागतात.” हे ऐकून प्रेक्षक टाळ्या वाजवू लागतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नवलंच म्हणायचं अन् काय! ‘रोमान्स किंग’ शाहरुख खानमुळे अभिनेत्रीने दिवसभर धुतले नव्हते आपले हात

-‘माझ्या वॉचमॅन आणि ड्रायव्हरने मला…’, न्यूड व्हिडिओ लीकवर उघडपणे बोलली राधिका आपटे

-फक्त शर्ट घालून अभिनेत्री दीपिका सिंगने केले सिझलिंग फोटोशूट, पाहून तुमचंही हरपेल भान

हे देखील वाचा