Saturday, June 29, 2024

‘इंडियन आयडल १२’ चा भाग बनल्यामुळे गायिकेने साधला ‘सदाबहार’ अभिनेत्री रेखावर निशाना, तर अनु मलिकला म्हटले क्रूर

बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. ती तिच्या गाण्यांशिवाय सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर निष्पक्ष मते मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. सोना मोहपात्रा सोशल मीडियावर अनेकदा मोकळेपणाने विधाने करत असते. आता तिने हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

रेखा नुकत्याच लोकप्रिय गायन रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल 12’ चा भाग झाल्याबद्दल चर्चेत आल्या होत्या. शोमध्ये पोहोचून त्यांनी सर्व स्पर्धक आणि जजसोबत खूप मजा देखील केली होती. रेखा या ‘इंडियन आयडल’चा भाग बनल्याबद्दल गायिका सोना मोहपात्राने निराशा व्यक्त केली आहे. तसेच, तिने गायक अनु मलिकबद्दल एक मोठे विधान केले आहे.

‘मीटू’ (MeToo) चळवळीच्या माध्यमातून अनु मलिकवर लैंगिक छळाचे आरोप केले गेले होते. ज्यामुळे तो बर्‍याच दिवसांपासून इंडियन आयडलचा भाग नव्हता, परंतु अलीकडेच तो पुन्हा एकदा इंडियन आयडलमध्ये दिसला. अशा परिस्थितीत, सोनाने या शोचा भाग झाल्यामुळे रेखा यांच्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर तिने अनु मलिकचे क्रूर म्हणून वर्णन केले आहे. हे सर्व विधान तिने सोशल मीडियावर केले आहे.

या गायिकेने तिच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर लिहिले की, “एक चांगल्या कलाकार आणि हुशार महिला रेखा यांना सोशल मीडियावर एका दुःखद गायन रियॅलिटी शोचे समर्थन करताना पाहून मला आनंद झाला. दुःखद का? जो शो एका प्रसिद्ध सीरियल लैंगिक शोषण करणाऱ्याला आपल्यात सहभागी करून घेतो, अशा शोला आपण काय म्हणाल? अनु मलिक, हॅशटॅगसाठी देखील पात्र नाहीये, #इंडिया.”

सोना महापात्राचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्विटवर तिचे चाहते आणि सोशल मीडिया युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. अलीकडेच प्रत्येक विषयावर निर्भीडपणे बोलणाऱ्या सोनाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. खरं तर ही धमकी तिला, फाटलेल्या जीन्सच्या वादाच्या संदर्भात सोशल मीडिया पोस्ट केल्यामुळे मिळाली होती. त्यानंतर सोनाने तिचे कमेंट सेक्शन बंद करून, मुंबई पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तमिळनाडू निवडणूक २०२१: मतदान करण्यासाठी पोहोचले साऊथ सुपरस्टार; कोणी कुटुंबासह, तर कोणी सायकलवरून लावली हजेरी

-‘बेबो’चे वडील रणधीर कपूर यांनी चुकून शेअर केला ‘सैफीना’च्या दुसऱ्या मुलाचा फोटो? फोटो होतोय जोरदार व्हायरल

-नाचा रे! वडील कमल हासन यांच्या निवडणूक प्रचारासाठी अभिनेत्रीने लावले ढोल- ताशावर ठुमके, पाहा जबरदस्त डान्स व्हिडिओ

हे देखील वाचा