Tuesday, February 4, 2025
Home मराठी अभिनेत्री एरिका फर्नांडिसने भर रस्त्यात दाखवले ऍब्ज! पहा काय जबरदस्त फिट आहे एरिका

अभिनेत्री एरिका फर्नांडिसने भर रस्त्यात दाखवले ऍब्ज! पहा काय जबरदस्त फिट आहे एरिका

‘कसौटी जिंदगी के 2’ च्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री एरिका फर्नांडिस सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. टीव्हीवर साधी भोळी दिसणारी एरिका खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आणि सुंदर आहे. तिच्या फिटनेसवर ती विशेष लक्ष देते. अलीकडेच तिने भर रस्त्यात आपले ऍब्ज दाखवले.

अलीकडे, एरिका फर्नांडिसला पैपराजीजने शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बाहेर स्पॉट केले. पैपराजीजने तीला विचारले की तू इतकी तंदुरुस्त आहेस, याचं रहस्य काय आहे? या प्रश्नावर एरिका हसली. ती म्हणाली, नाही, माझे असे काही रहस्य नाही.

या संभाषणात तिने सांगितले की ती ब्रेड आणि भाकरीशिवाय सर्व काही खात असते. तिने सांगितले की भाकरी आणि ब्रेड खाल्ल्याने पोट बाहेर येते. तिच्या म्हणण्यानुसार भाकरी न खाल्याने खूप फरक पडतो. असं सांगताना हसत हसत भर रस्त्यात तिने पैपराजीजला ऍब्ज दाखवले.

Erica Fernandez flaunting her Abs in the middle of a road

एरिका फर्नांडिस हिचं अलीकडेच ‘जुदा कर दिया’ हे नवं गाणं प्रसिद्ध झालं आहे, ज्याला चाहत्यांनी खूप प्रेम दिलं आहे. टीव्ही सीरियल ‘कसौटी जिंदगी की २’ मध्ये प्रेरणा साकारणार्‍या एरिका फर्नांडिसला चाहत्यांची फारशी कमी नाहीये.

थेट चॅट दरम्यान एरिका फर्नांडिसने सांगितले की ती तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे पण ती व्यक्ती इंडस्ट्रीशी संबंधित नाही. एरिका फर्नांडिस पुढे म्हणाली की मी अविवाहित आहे. मी रिलेशनशिपमध्ये आहे परंतु ती व्यक्ती या मनोरंजन उद्योगातील नाही.

याशिवाय एरिकाच्या करियर बद्दल बोलायचं झालं तर तिने आतापर्यंत ७ चित्रपट, दोन टीव्ही मालिका आणि दोन गाण्यांच्या व्हिडिओमध्ये काम केलं आहे. २०१३ मध्ये तिने ‘ऐंथु ऐंथु ऐंथु’ या तामिळ चित्रपटात काम केलं. यानंतर तिचे २०१४ मध्ये तिचे चार विविध भाषांमधील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. २०१५ आणि २०१७ मध्ये प्रत्येकी एक एक चित्रपट प्रदर्शित झाला.

यानंतर ती मालिका क्षेत्राकडे वळली. तिने ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेमधून टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर तिने ‘कसौटी जिंदगी की २’ या मालिकेत सुद्धा काम केलं. याशिवाय ‘जुदा कर दिया’ आणि ‘मौला’ या दोन गाण्यांमध्येही तिने तिची अदाकारी दाखवली आहे.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा