Tuesday, July 9, 2024

‘चांद ये हर रोज मैं देखू..! राहुल वैद्य आणि अनुष्का सेनने सोबत गायलं रोमँटिक गाणं, पाहा व्हिडिओ

लोकप्रिय टीव्ही रियॅलिटी शो ‘बिग बॉस १४’ मधील उपविजेता राहुल वैद्य लवकरच टीव्ही शो ‘खतरों के खिलाडी ११’ मध्येही दिसणार आहे. शोमध्ये भाग घेण्यासाठी सर्व स्पर्धक केपटाऊनमध्ये पोहोचले आहेत. या शोमध्ये अनुष्का सेनही भाग घेत आहे. दरम्यान, शोचे स्पर्धक राहुल आणि अनुष्कामध्ये अप्रतिम बाँडिंग पाहायला मिळत आहे. एक दिवसापूर्वी यांचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत होते, तर आज त्यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर धमाल करत आहे.

इंटरनेटवर राहुल वैद्य आणि अनुष्का सेनचा हा रोमँटिक अंदाजातील व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे आणि कमेंट बॉक्समध्ये युजर्स दोघांचेही कौतुक करत आहेत. वास्तविक, अनुष्काने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये राहुल ‘चांद ये हर रोज मैं देखू…’ हे गाणे गाताना दिसत आहे. तसेच दोघेही एकत्र या गाण्यावर परफॉर्म करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत अनुष्काने राहुलच्या आवाजाचेही कौतुक केले आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ २४ तासात इंस्टाग्रामवर ५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

अनुष्का सेनबद्दल बोलायचे झाले, तर ती अवघ्या १८ वर्षांची आहे आणि ‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये भाग घेणारी सर्वात तरुण स्पर्धक बनली आहे. अगदी लहान वयातच अनुष्का सेनने बरीच प्रसिद्धी मिळविली. इंस्टाग्रामवर तिचे तब्बल १८ दशलक्ष फाॅलोवर्स आहेत. अनुष्का आपल्या व्हिडिओंमुळे दरदिवशी चर्चेत येते.

राहुल वैद्यबद्दल बोलायचे झाले, तर तो एक उत्कृष्ट गायक आहे. अलीकडेच गर्लफ्रेंड दिशा परमारसोबत त्याचे ‘मधाणया’ हे गाणे रिलीझ झाले होते. ज्याला चाहत्यांनी खूप प्रेम दिले. आता राहुल आणि अनुष्का सेन केपटाऊनमध्ये एकमेकांसोबत फिरत आहेत. इतकेच नाही तर दोघे एकत्र मिळून केपटाऊच्या कानाकोपऱ्यात हिंडत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा