Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड नोरा फतेहीच्या ‘दिलबार दिलबर’ या गाण्यावर लावले माधुरी दीक्षितने ठुमके

नोरा फतेहीच्या ‘दिलबार दिलबर’ या गाण्यावर लावले माधुरी दीक्षितने ठुमके

माधुरी दीक्षित ह्यंनी नुकताच ‘डांस दीवाने ३’ मधिल एक व्हिडीओ आपल्या इंट्राग्रामवर टाकलाय, ज्यात त्या ‘मेरा पिया घर आया’ या धमाकेदार गाण्यावर ठुमके लावताना दिसत आहेत तर, अजून एक खास गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत नोरा फतेही ही सुध्दा जबरदस्त ठुमके लावताना दिसत आहे. माधुरीयांच्याकडे बघून नोरा त्यांच्यासारखे नृत्य करायचा प्रयत्न आहे. हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते वेडे झाले आहेत, आणि त्या दोघांच्याही नृत्याचे कौतुक करत आहेत.

 

यासोबतच कलर्स वाहिनीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नोराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यातील व्हिडिओमध्ये ती माधुरी दीक्षितयांच्यासोबत जबरदस्त नृत्य करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की नोरा फतेही माधुरी यांना तिच्या ‘दिलबर दिलबर’ या लोकप्रिय गाण्याच्या काही स्टेप शिकवत आहे. त्यावर माधुरी दीक्षित यांनी कमालीचे नृत्य सादर केले आहे.

माधुरी दीक्षित या हल्ली टीव्ही कार्यक्रमांकडे वळताना दिसत आहेत ,ज्यात त्या आपल्या नृत्याची खासियत बऱ्याचदा प्रेक्षकांना दाखवताना दिसतात. तर नोरा फतेही ही आपल्या सत्यमेव जयते २ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

हे देखील वाचा