Tuesday, July 9, 2024

तालिबान्यांना राखी बांधू इच्छिते ‘ही’ अभिनेत्री; म्हणाली, ‘आयडिया कशी वाटली मोदीजी?’

गेल्या महिन्याभरापासून अफगाणिस्तानवर तालिबानी आपली हुकूमत गाजवत आहेत. तालिबान्यांचा सुरु असलेले जुलूम संपूर्ण जग पाहत आहे. दिवसाढवळ्या तेथे सुरु असलेला गोळीबार, महिलांवर बुरख्याची व पुरुषांवर दाढी वाढवण्याची सक्ती असे काहीसे दृश्य त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जी लोक हे नियम पाळणार नाहीत त्यांना अमानुषपणे शिक्षाही दिली जात आहे. तालिबान्यांच्या या हुकूमशाहीमूळे अफगाणी नागरिक पुरते हताश झाले आहेत. नागरिक तालिबान्यांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी तेथून पळ काढत आहेत. अशा तालिबान्यांना अभिनेत्री माहिका शर्मा राखी बांधू इच्छिते.

माहिका शर्माचा जन्म हरियाणा येथे झाला. ती अभिनय क्षेत्रात कार्यरत असून तिने आता पर्यंत अनेक हिंदी, आसामी चित्रपटात काम केले आहे. या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दरम्यान तालिबान्यांना भाऊ बनवलं पाहिजे, असं मत तिने व्यक्त केलं आहे. तिच्या या वक्तव्यामुळे सध्या ती चर्चेचा विषय बनली आहे. माहिका म्हणते की, “तालिबान्यांना त्यांच्या आई आणि बहिणीचं प्रेम कधीच मिळालं नाही, त्यामुळे ते असे क्रूर बनले आहेत. त्यांच्यासोबत युद्धाने अथवा भांडण करून अफगाणी महिलांचे संरक्षण होणार नाही. त्यांना प्रेमाने समजवणे फार गरजेचे आहे. त्यांना मी भाऊ बनवलं, तर त्यांना माझ्या विषयी आपुलकी वाटेल आणि इतर महिलांचा देखील ते आदर करतील. मला अफगाणी महिलांची फार चिंता वाटते. आपल्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यामध्ये मोठ मोठ्या दरोडेखोरांना देखील शांतीच्या आणि प्रेमाच्या मार्गाने शांत करता आले आहे. मला असं वाटतं आपण सर्वांनी अफगाणी नागरिकांसाठी एक होणं खूप गरजेचं आहे.” (tv mahika sharma wants to tie rakhi to talibanis)

माहिकाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून हे ट्वीट शुक्रवारी (२० ऑगस्ट) केले आहे. काहींनी तिच्या या वक्तव्याचा गांभीर्याने विचार केला, तर काहींनी तिच्या विरोधातही कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री या ट्वीटनंतर चांगलीच ट्रोल होऊ लागली आहे. तिच्या या ट्वीटला काहींनी कमेंट करत असं सांगितलं की, “कदाचित तुला माहित नसेल, ते लोक रक्षाबंधन नाही मानत. बहीण भावाचं पवित्र नातं त्यांना नाही समजत, तरी तुला जायचे असेल तर जा.” तर, दुसऱ्या एकाने कमेंटमध्ये असे म्हटले आहे की, “आम्हाला माहित आहे तू असं का करतेस. इतकेदिवस तुला कोणीच ओळखत नव्हतं आणि आता दोन दिवस लोक तुझी चर्चा करतील, नंतर पुन्हा तुला विसरून जातील.”

अभिनेत्रीच्या चित्रपटातील कारकिर्दीबाबत बोलायचे झाले तर, अभिनेत्री ‘कोनिकार रामदेनु’ या आसामी चित्रपटात २००३ मध्ये बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर साल २०१९ मध्ये प्रकाशित झालेला ‘द मॉडर्न कल्चर’ या चित्रपटात अभिनेत्रीने काम केले. तसेच २०१४ मध्ये ती ‘एफआयआर’ या मालिकेमध्येही झळकली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा