Friday, July 5, 2024

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानला पितृशोक, हृदयविकारामुळे वडिलांनी घेतला जगाचा निरोप

सुप्रसिद्ध  टीव्ही अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे निधन झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, हिनाच्या वडिलांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला आहे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे वडिलांच्या मृत्यूच्या वेळी हिना त्यांच्यासोबत नव्हती, शूटिंगच्या संदर्भात ती काश्मीरला गेली होती. वडिलांची बातमी कळताच,हिना खान कश्मीरहुन मुंबईकडे रवाना झाली आहे. हिना तिच्या वडिलांच्या अगदी जवळ होती.

लॉकडाऊन दरम्यान अर्थव्यवस्थेचे कठोर पालन व्हावे यासाठी हिनाच्या वडिलांनी तिचे सर्व क्रेडिट आणि डेबिट कार्ड देखील ब्लॉक केले होते. एका व्हिडिओतुन तिने हे सांगितले होते. संगीत आणि चित्रकलेची आवड असणारी हिना खान पत्रकार होणार होती, परंतु हिना अचानक टीव्ही मालिकांकडे वळली, “ये रिश्ता क्या काहलता है” या प्रसिद्ध मालिकेतून अक्ष्ररा या भूमिकेतून  हिना ही  घराघरात पोहोचली आहे, तिच्या वडिलांना तिचे हे काम करणे मान्य नव्हते, परंतु हिनाने एवढी मेहनत घेतली की, तिच्या कामाकडे बघून त्यांनी तिला पाठिंबा द्यायला सुरवात केली.

बऱ्याचदा तिचे फोटो वडिलांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असे. हिना खान ही ‘बिग बॉस  हिंदीच्या २०१६ च्या कार्यक्रमात एक पाहुणी  म्हणून दिसली होती, जिकडे ती रोहन या कलाकाराला पाठिंबा द्यायला गेली होती. तिच्या भूमिकांमुळे तिने अनेक पारितोषिके जिंकली आहेत. हिना आणि वडिलांचे नाते  खूप घट्ट होते, ती त्यांची एकुलती एक मुलगी आहे .

हे देखील वाचा