Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘ओह माय गॉड!’ निया शर्माच्या कातील अदांनी हादरवलं सोशल मीडिया

टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री निया शर्माची बोल्ड स्टाईल सतत चाहत्यांना पाहायला मिळते. सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करुन अभिनेत्री नेहमी चर्चेत राहते. नियाने अलीकडेच घरात डान्स करत असतानाचा तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला होता. ज्यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला होता. घरातील डान्सनंतर, आता नियाने रस्त्यावरही डान्स करत व्हिडिओ शेअर केला आहे.

निया शर्माने हा डान्स व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये निया तिच्या मित्रांसोबत रस्त्यावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये निया खूपच सुंदर दिसत आहे. नियाच्या डान्स स्टेप्स इतक्या उत्कृष्ट आहेत की, ते पाहून चाहते बर्‍याच कमेंट करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत नियाने अक्षय जैनला टॅग केले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, “माझ्या मागण्यांचे मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद… हे मजेदार होतं.”

नियाच्या या डान्स व्हिडिओवर कमेंट करत एका सोशल मीडिया युजरने लिहिले “कूल.” दुसऱ्याने लिहिले, “ओह माय गॉड, यु आर किलिंग ईट निया.” तसेच, व्हिडिओचे कमेंट सेक्शन हार्ट व फायर ईमोजीने भरले आहेत. काही तासातच या व्हिडिओवर ७३ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर माध्यमातील वृत्तानुसार, ‘बिग बॉस १४’ फेम गायक राहुल वैद्य आणि निया शर्मा एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र दिसणार आहेत. राहुल आणि निया यांच्या गाण्यांचे दिग्दर्शन विराज जोशी करणार आहे. दोघांच्या गाण्यांचे पोस्टर्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, निया आणि राहुल यांच्याद्वारे याबद्दल अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही.

हे देखील वाचा