Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अरेरे! निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये घेत होती सर्फिंगची मजा, तेव्हाच बिघडला बॅलन्स आणि पुढे काय झालं पाहाच…

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून अनेकदा चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नियाला तिच्या मित्रांसोबत हँगआउट करायला खूप आवडते. जेव्हा जेव्हा तिला शूटिंगनंतर वेळ मिळतो, तेव्हा ती तिच्या मित्रांसह मजा करण्यासाठी बाहेर पडते. नियाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये लक्झरी वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान समुद्राच्या मध्यभागी हवेत आनंद घेत मजा करताना असे काही झाले की, तिने ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

नियाने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती निळ्या रंगाची बिकिनी परिधान करुन समुद्रावर उडताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीस, निया फ्लाईंग बोर्डवर सुंदरपणे सर्फिंग करताना दिसत आहे, परंतु काही सेकंदानंतरच निया शर्माचे संतुलन बिघडते, आणि ती पाण्यात पडते. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नियाने लिहिले आहे,’उंचावरून पडण्याचासुद्धा आनंद घेत चला.’

प्रेक्षकांना नियाचा हा व्हिडिओ खूप आवडला. चाहते असे म्हणत आहेत की, ‘सर्व काही ठीक आहे ना?’ एका चाहत्याने सांगितले की, ‘मी तर समुद्राच्या मध्यभागी बुडण्याच्या विचारानेच मरून जाईल. तुमचा व्हिडीओ बघून मी तुमचे कौतुक करतो.’ दुसर्‍या चाहत्याने लिहिले आहे की, ‘हे पाहिल्यानंतर मी माझे हसू थांबवू शकत नाही आहे.’

निया शर्मा ही रवी दुबेसोबत त्यांची ‘जमाई राजा सिझन २.०’ वेब मालिकेमुळे खूप चर्चेत आहेत. या शोमध्ये दोघांनीही खूप बोल्ड सीन दिले आहेत. अलीकडेच नियाने रवीबरोबरचा एक धमाकेदार डान्स व्हिडिओही शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फॅन असावी तर अशी! लहानग्या चाहतीकडून राखी सावंतला १.५ लाख रुपयांचं गिफ्ट; अभिनेत्रीही झाली भलतीच खुश

-घरात शिरलेल्या गोरिलाला बाहेर काढण्याऐवजी श्रद्धा कपूरने लावले त्याच्यासोबत जोरदार ठुमके, पाहा मजेशीर व्हिडिओ

-व्हिडिओ: दिया मिर्झाने केला सावत्र मुलीचा वाढदिवस साजरा, वैभव रेखीच्या एक्स वाईफनेही लावली हजेरी

हे देखील वाचा