Monday, July 15, 2024

राखी सावंत करणार आणखी एकदा सर्जरी, सर्जरी आधी बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडिओ व्हायरल

टीव्ही अभिनेत्री राखी सावंत ही नेहमी आपल्या बोल्ड आणि प्रेम प्रकरणामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते, तिचे व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात यामुळे तिला ट्रोलही केले जाते. काही दिवसापूर्वी ती तीच्या शरीरातील अवयव दान करणार असल्याच्या वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली होती. सध्या तिने आपल्या अधिकृत इन्सटाग्राम अकाउंटवर नुक्ताच एक  व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मिडियावर  हा व्हिडीओ तुफान व्हायरले होत आहे. जाणून घेउया की, काय आहे व्हिडीओची पूर्ण माहिती.

राखी सावंत (Rakhi Sawant)

राखीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे जो की, सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तिने दवाखाण्यात शूट केला आहे, ती सर्जरी करणार असल्याचे समोर आले आहे. तिने सर्जरी आगोदर मुड फ्रेश आणि आनंदी करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये ती अपला बॉयफ्रेंड आदील खान (Adil Khan)सोबत दिसत आहे, राखीने हा व्हिडिओ शेअर करत सांगितले की, “मी डान्सशिवाय कोणत्याच परिस्थितीमध्ये नाही राहू शकत नाही.”  या व्हिडिओमध्ये तिच्या हाताला सलाइन लावलेले होते आणि तिने नाइट ड्रेस परिधान केला होता.

राखीने आता आलेल्या अनन्य पांडे आणि विजय देवरकोंडा यांच्या लायगर चित्रपटातील ‘आफत’ या गाण्यवर डांन्स केला आहे. तिने या डांन्सला ‘प्री सर्जरी’ असे नाव दिले आहे. या व्हिडिओमध्य राखी एकटीच नाचताना दिसते आणि मग नंतर तिचा बॉयफ्रेंड आदिल खान देखिल तिच्यासोबत नाचताना दिसतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

राखीच्या डांन्सला निशा रावलने केली कमेंट

राखी सावंतने या भन्नाट डान्सला शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “डान्स मला कोणत्याच कंडिशनमध्ये सोडत नाही. “हॅशटॅग हॉस्पिटल, प्री सर्जरी…!” तिच्या व्हिडिओला इंडस्ट्रीतील जोडलेले कलाकार अर्थातच  राखीच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत आणि तिच्या सर्जरीबद्दल विचारपूस केली आहे. त्यापैकी निशा रावल हिने कमेंट करत लिहिले, “क्युटी प्लीज लवकर ठीक हो.”

सोफियानेही विचारले हाल

राखीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. निशा नंतर सोफिया हयातनेही काळजी करत कमेंट केली, “कोणती सर्जरी???? मी प्रार्थना करत आहे आणि शुभेच्छा पाठवत आहे. काहीच चुकीचे नाही होणार. तुमचे आयुष्य पुन्हा रुळावर येइल. तुमच्यासोबत तुमचा आदिल आणि तुमची तब्येत आहे.” आणि तिथेच एका नेटकऱ्यांनी कमेंट करत विचारले, “तुम्ही दवाखान्यात का आहेत? काय झालं?”

राखी आणि आदिलच्या डांन्सची प्रशंसा

राखी सावंतच्या या डान्स व्हिडिओला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे, सध्या राखीवर नेटकऱ्यांच्या कमेंटचा पाऊस पडत आहे. त्याच्यापैकी एका चाहत्याने कमेंट करत लिहिले, “ध्यान ठेवा राखीजी… गेट वेल सून.” आणखी एकाने लिहिले, “तुम्ही खूप भारी आहेत राखी जी.” एका युजरने आदिलच्या डांन्सची प्रशंसा करत लिहिले की, “आदील कॅन डांन्स साला ला ला.” आनखी एकाने लिहिले, “नाइस डान्स.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा
मी आजही रडते..’, प्रियांका चोप्राने केला तिच्या आयुष्यातील त्या घटनेचा खुलासा
बापरे! ‘किंग खान’ला वाटते ‘या’ गोष्टीची भिती; नाकारली ‘डॉन 3’ची ऑफर
कॉलेजच्या रॅगिंगने बदलले चित्रांगदा सिंगचे आयुष्य, ‘अशी’ मिळाली पहिली ऑफर

 

हे देखील वाचा