Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘देवों के देव महादेव’ कार्यक्रमातील श्री शंकराची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याने गुपचूप उरकले लग्न, पाहा फोटो

मागील वर्षी म्हणजेच २०२१ च्या शेवटी अनेक कलाकार लग्नबंधनात अडकल्याचे आपण पाहिले. त्यात विकी कौशल- कॅटरिना कैफ, राजकुमार राव- पत्रलेखा, अंकिता लोखंडे- विकी जैन यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. अशातच आता २०२२ या वर्षाच्या सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीव्हीवरील ‘देवों के देव महादेव’ या मालिकेत भगवान शंकराची भूमिका साकारणारा अभिनेता मोहित रैनाने गुपचूप लग्न केले आहे. मोहितने आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या निमित्ताने मोठे सरप्राइज दिले आहे.

एका खासगी समारंभात अभिनेता मोहित रैनाने (Mohit Raina) अदिती (Aditi) हिच्यासोबत सात फेरे घेतले आहेत. अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते प्रतिक्रियांचा पाऊस पाडत आहेत. फोटोंचा कमेंट सेक्शन अभिनंदन आणि शुभेच्छांनी भरला आहे.

मोहित रैनाने केले लग्न (Mohit Raina Marriage)
प्रसिद्ध अभिनेता मोहित रैनाने आपल्या लग्नाचे फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो पांढऱ्या रंगाच्या शेरवानीत दिसत आहे. दुसरीकडे त्याची पत्नी अदितीने खूप सुंदर आणि बारीक डिझाईन असणारा लेहंगा परिधान केला होता. मोहित आणि त्याची पत्नी एकत्र खूपच गोड दिसत आहेत. या फोटोंना मोहितने कॅप्शनही तितकेच सुंदर दिले आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने आपल्या कॅप्शनमार्फत सर्वांकडून शुभेच्छा मागितल्या आहेत. नवीन वर्षाच्या खास क्षणी चाहत्यांना मोठे सरप्राइज दिले आहे.

मोहित रैनाने त्याच्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताच, कमेंट बॉक्समध्ये अभिनंदन आणि शुभेच्छांचा पूर आला आहे. चाहते त्यांच्या आवडत्या अभिनेत्याला नवीन सुरुवातीसाठी शुभेच्छा देत आहेत.

मोहित रैनाने टीव्ही जगतात मोठे नाव कमावले आहे. अनेक प्रसिद्ध टीव्ही शो केल्यानंतर, मोहित लोकप्रिय बॉलिवूड चित्रपट ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’मध्ये देखील दिसला होता. मोहित शेवटचा मोठ्या पडद्यावर डायना पेंटीसोबत ‘शिद्दत’ या चित्रपटात दिसला होता.

हे देखील वाचा