प्रसिद्ध हिंदी टीव्ही मालिका ‘इश्कबाज’मध्ये शिवायची भूमिका साकारलेला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता नकुल मेहता बाबा बनला आहे. त्याची पत्नी जानकी मेहताने मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी नकुलने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यानंतर त्याच्यावर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नकुलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये त्याचा, त्याच्या मुलाचा आणि त्याच्या पत्नीचा हात दिसत आहे. हा फोटो शेअर करत नकुलने सांगितले की, त्यांच्या घरी ३ फेब्रुवारीला लहान पाहुण्याने जन्म घेतला आहे. ही पोस्ट पाहून चाहत्यांना भलताच आनंद झाला आहे. ते या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत.
नकुल आणि जानकी नेहमीच सोशल मीडियावर आपले सुंदर फोटो शेअर करत असतात. ही जोडीदेखील चाहत्यांच्या पसंतीची जोडी आहे. मागील काही दिवसांमध्ये नकुलने पत्नी जानकीसोबत अनेक फोटो शेअर केले होते. त्यामध्ये जानकी गरोदरपणाचा आनंद लुटताना दिसत होती.
दुसरीकडे नकुलनेही एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये नकुल आणि जानकीने आपल्या आयुष्यातील खास क्षण शेअर केले होते. या व्हिडिओमध्ये दाखवले होते की, लहानपणीचे मित्र नकुल आणि जानकी कशाप्रकारे रिलेशनशीपमध्ये आले, दोघांनी लग्न केले आणि आता दोघेही आई-वडील बनणार आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नकुलने लिहिले होते की, “बेस्ट फ्रेंड- गर्लफ्रेंड- मिसेस.”
खरं तर नकुल मेहता आपल्या रोखठोक मतांसाठीही ओळखला जातो. तो नेहमी सामाजिक मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत माडतो. त्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर नकुल मेहताने टीव्ही शो ‘प्यार का दर्द मीठा मीठा प्यारा प्यारा’मध्ये काम केले होते. या मालिकेला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले होते. यामधूनच नकुलला ओळख मिळाली होती. यानंतर त्याने ‘इश्कबाज’ मालिकेत शिवायची भूमिका साकारली होती.
हेही वाचा-
आनंदाची बातमी! विराट- अनुष्काने मुलीसोबतचा पहिला फोटो केला शेअर, सांगितले मुलीचे नाव