Friday, July 5, 2024

जेव्हा शूटिंग दरम्यान लोकप्रिय अभिनेत्रीला मारला बूट फेकून, व्हिडिओ होतोय व्हायरल

कोरोनाच्या सध्याच्या काळात लॉकडाऊन आणि विषाणूच्या भीतीने सर्वजण घरात बसून आहेत. अशा परिस्थितीत टीव्ही मालिका आणि करमणुकीची इतर साधने ही प्रेक्षकांना दिलासा देतात. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लोक आपला वेळ घालवत आहेत. या सर्वामध्ये एका अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये काही लोक ‘गोल्ड डिगर…गोल्ड डिगर’ असे ओरडताना दिसत आहेत. त्याचवेळी, अभिनेत्री सूटकेस घेऊन जाताना दिसत आहे, जिच्यामागे रागाने तापलेल्या लोकांचा समूह आहे. व्हिडिओ पाहून सर्वजण चकित झाले आहेत. वास्तविक, ही खरी नाही, तर स्क्रिप्टेड व्हिडिओ क्लिप आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये टीव्ही अभिनेत्री रिचा राठोड आहे. तसेच यात अन्य कलाकारही दिसत आहेत. तर हा व्हिडिओ स्टार प्लसवरील ‘आप की नजरों ने समझा’ मालिकेच्या शूटिंग दरम्यानचा आहे.

हा व्हिडिओ व्हायरल भयानीने इंस्टाग्रामवर शेअर केला असून, तो बराच पाहिला जात आहे. यात अभिनेत्री रिचा राठोड सुटकेस घेऊन घर सोडून जायचा अभिनय करत आहे. कुटुंबातील बाकीचे सदस्य मागे उभे राहून तिला जाताना पाहत आहेत. त्याचवेळी ते जोरात ‘गोल्ड डिगर’ म्हणून ओरडत आहेत. एवढेच नाही तर, एकाने मागून बूटही फेकले.

‘आप की नजरों ने समझा’ ही मालिका प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहे. या मालिकेत रिचा राठोड शिवाय विजयेंद्र कुमेरिया, नारायणी शास्त्री, अभिषेक वर्मा, केतकी कदम, अबीगेल जैन, अयाज अहमद आणि वरुण शर्मा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मास्क घाला, मला पुन्हा थाळी वाजवायची नाहीये!’ पाहा तर काय म्हणतेय ‘भाईजान’ची मुन्नी

-दु:खद बातमी! ‘आरारारा…खतरनाक’ फेम गीतकार प्रणित कुलकर्णी यांचे निधन

-व्यसनाच्या आहारी गेल्याने अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते ‘हे’ कलाकार, काही नावे वाचून धक्का बसेल

हे देखील वाचा