Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अरेरे! ‘बबिता जी’च्या चेहऱ्याला झालं तरी काय? व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

टीव्हीवर सर्वाधिक काळ चालणारी विनोदी मालिका कोणती? असा जर प्रश्न विचारला, तर त्याचं उत्तर एकच, ते म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ होय. ही विनोदी मालिका तब्बल १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. टीआरपीच्या यादीतही या मालिकेने चांगली कामगिरी केली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने आपलंसं करतं. त्यातील प्रत्येकाची एक वेगळीच आणि जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. मात्र, या सर्वात आपल्या स्टाईल आणि लूकमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची ‘बबिता जी’ होय. मुनमुनच्या सुंदरतेचे केवळ जेठालालच दीवाने नाहीत, तर देशभरातील सर्वच चाहते तिचे दीवाने आहेत. मुनमुन आपल्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही भलतीच सक्रिय असते. ती आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच आता तिने शेअर केलेला एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे.

खरं तर मुनमुनने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपला एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती मोबाईल ऍपमार्फत विचित्र चेहरा बनवताना दिसत आहे, जे खूपच मजेशीर आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून तिला ओळखणेही कठीण होईल आणि धक्काही बसेल. मात्र, त्यानंतर तुम्ही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाहीत. विशेष म्हणजे ती स्वत:च आपला चेहरा पाहून जोरजोरात हसत आहे. व्हिडिओत तिची एक मैत्रीणही दिसत आहे. तीदेखील खूपच मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. यादरम्यान मुनमुन दत्ताने जांभळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. (TV Serial Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Babita Ji Aka Munmun Dutta Shared Her Hilarious Video)

तिने हा व्हिडिओ पोस्ट करत मजेशीर कॅप्शनही दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आतापर्यंतचे सर्वात विचित्र फिल्टर.” मुनमुनच्या या व्हिडिओला आतापर्यंत ६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच १ लाखांपेक्षाही अधिक लाईक्सचा पाऊसही पडला आहे. त्याचबरोबर चाहते फनी इमोजी पोस्ट करताना दिसत आहेत.

मुनमुनने नुकतेच आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने लाईट पीच रंगाचा डीप नेक प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे. या फोटोंमध्ये ती वेगवेगळे पोझ देताना दिसत आहे.

तिच्या या अदा पाहून चाहत्यांचीही बत्ती गुल झाली आहे. चाहते कमेंट्स करून हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत. या फोटोला आतापर्यंत २ लाख ५० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिकिनी परिधान करून ज्यूस काढताना दिसली जान्हवी कपूर; मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

-जेव्हा गाणे गाताना अचानक ओरडली मिताली, पाहुन सिद्धार्थही झाला स्तब्ध; मग पुढे…

-रितेश अन् नीलमचं ‘मटक मटक के’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; एकाच दिवसात मिळाले ‘एवढे’ व्ह्यूज

हे देखील वाचा