टीव्हीवरील प्रसिद्ध आणि प्रेक्षकांना खदखदून हसवणारी मालिका कोणती? असा प्रश्न विचारल्यावर सर्वांच्या मुखात सर्वप्रथम नाव येते, ते म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ होय. या मालिकेने एक दशकापेक्षाही अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेतील ‘जेठालाल’, ‘बापूजी’, ‘दयाबेन’, ‘बबिता’ आणि ‘पोपटलाल’ यांसारख्या पात्रांनी उत्तम अभिनय सादर केला. यातील जवळपास सर्वच पात्र सोशल मीडियावर सक्रिय असतात. यातीलच एक अभिनेत्री बबिता म्हणजेच मुनमुन दत्ताही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात कोणतीही कसर सोडत नाही. अशातच आता पुन्हा एकदा तिने आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला चांगली पसंती मिळत आहे. (TV Serial TMKOC Fame Actress Munmun Dutta Ramp Walk Video Went Viral On Social Media)
मुनमुन दत्ताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओत हिरव्या रंगाचा गाऊन घातला असून सुंदर ‘रँप वॉक’ करताना दिसत आहे. व्हिडिओनंतर तिने चाहत्यांना इम्प्रेस करण्यासाठी लागोपाठ फोटोही शेअर केले आहेत. त्यामुळे तिचे चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. मुनमुनचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
या हॉट अंदाजातील स्लो- मोशन क्लिपमध्ये ती मॉडेल वॉक करताना दिसत आहे. तिच्या आजूबाजूचा परिसर हा रेस्टॉरंट असल्याचे दिसत आहे. हाय स्लिट हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये मुनमुन खूपच आकर्षक दिसत आहे.
हा व्हिडिओ शेअर करत मुनमुनने कॅप्शनमध्ये ‘थोडा धावपळीचा क्षण,’ असे लिहिले आहे. या व्हिडिओवर चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत १ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स आणि १० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
मुनमुन मागील काही दिवसांपूर्वी वादात अडकली होती. तिने सोशल मीडियावर आपल्या व्हिडिओमध्ये तथाकथित जातीवाचक शब्दाचा वापर केला होता. त्यामुळे तिच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर तिला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आणि तिच्यावरील कारवाई थांबवण्यात आली आहे.
मुनमुन दत्ता सन २००८ पासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत बबिता अय्यरची भूमिका साकारत आहे.यापूर्वी ती सन २००४ मध्ये ‘हम सब बाराती’ मालिकेत दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू