Wednesday, July 3, 2024

शहनाज गिलने गायले गाणे, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना झाली सिद्धार्थची आठवण

शहनाज गिल (Shehnaaz Gill) आणि सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) यांची प्रेक्षकांना जोडी चांगलीच आवडली होती. ‘बिग बॉस 13’ दरम्यान ही जोडी इतकी लोकप्रिय झाली की लोकांनी त्यांना ‘सिदनाज’ हे नाव दिले. मात्र गेल्या वर्षी सिद्धार्थच्या आकस्मिक निधनानंतर शहनाजवर दुखःचा डोंगर कोसळला होता. सिद्धार्थला जगाचा निरोप घेऊन एक वर्ष होत आहे, पण शहनाज किंवा चाहते या अभिनेत्याला क्षणभरही विसरू शकले नाहीत. 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

शहनाजने नुकताच ‘कबीर सिंग’ चित्रपटातील ‘क्या हाल हो गया है’ गातानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता, त्यामुळे आता ती पुन्हा एकदा गाणे गाऊन सिद्धार्थची आठवण काढताना दिसतेय. शहनाजने नुकतेच ‘लोग हमसे जलते है’ गाणे गायले. हे गाताना शहनाज खूपच निरागस दिसत आहे. हे ऐकल्यानंतर चाहते शहनाजच्या गोड आवाजाचे कौतुक करत असतानाच ते भावूकही होत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा –
खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर राजूचे कुटुंब संतापले, उचलले मोठे पाऊल
दोनच दिवसात ‘लायगर’ चित्रपटाने गुंडाळला गाशा, कमावले फक्त ‘इतके’ कोटी
कपिल शर्माचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘यामुळे तुमची मर्दानगी संपत नाही’

हे देखील वाचा