Wednesday, June 26, 2024

तब्बल ६ आठवड्यानंतर शिल्पा शेट्टीने घेतली बहिण शमिताची गळाभेट; म्हणाली, ‘माझी टुनकी…’

प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला गेल्या काही दिवसांपूर्वी पाॅर्न व्हिडिओ प्रकरणी अटक केली. तेव्हापासून राजची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी चर्चेत आली. या प्रकरणानंतर शिल्पा टीव्ही शोपासून स्वता:ला दूर ठेवू लागली. त्यावेळी ती रियॅलिटी टीव्ही शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ च्या शूटिंगसाठीही जात नव्हती. मात्र, आता शिल्पा परत टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस ओटीटी’ शो प्रचंड चर्चेत आला आहे. अभिनेत्री शिल्पाची बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टीने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला होता‌. यानंतर शमिताची सहा आठवड्यानंतर शिल्पाने भेट घतली.

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सहभागी झाल्यामुळे शमिता घरापासून दूर होती. शमिता शेवटपर्यंत ‘बिग बॉस’ घरात राहिली आणि रियॅलिटी शोच्या टॉप ३ फायनलिस्टपैकी एक होती. मात्र, ती विजेत्याची ट्रॉफी जिंकू शकली नाही आणि दिव्या अग्रवालकडून पराभूत झाली. नुकतीच शिल्पाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. शिल्पाने शेअर केलेल्या फोटोमध्ये शिल्पा शमिताला किस करताना दिसत आहे. तर दुसर्‍या फोटो शिल्पाने शमिताला घट्ट मिठी मारली आहे. या फोटोमध्ये शिल्पाने निळ्या आणि पांढर्‍या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर शमिताने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

शिल्पाने फोटो शेअर करताना लिहीले की, “माझी ‘टुनकी’ परत आली आहे. शमिता आता तू या मिठीतून बाहेर पडू शकणार नाहीस. या घरात तुझे स्वागत आहे.” शिल्पाने शेअर केलेल्या या फोटोला काही तासांतच ५लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या फोटोवर चाहत्यासोबत कलाकारही कमेंट्स करताना दिसत आहेत. ‘बिग बाॅस ओटीटी’ सहा आठवडे चालू होता. दिव्या, राकेश बापट, निशांत भट, प्रतीक सहजपाल, नेहा भसीन, जीशान खान यांसारख्या कलाकारांसोबत शमिताने शोमध्ये भाग घेतला होता.

या शो दरम्यान, शिल्पाने शमिताला सपोर्ट करत कित्येक पोस्ट शेअर केल्या होत्या. मागील आठवड्यात शिल्पाने फिनालेच्या आधी शमिताचा एक व्हिडीओ शेअर केला होता. शामिताविषयी बोलायचे झाले, तर अक्षरा आणि दिव्याशी झालेल्या वादामुळे ती चर्चेत राहिली. तसेच राकेशसोबतच्या केमिस्ट्रीमुळेही मनोरंजन विश्वातही तिच्यावर बरीच चर्चा सुरू होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये स्पर्धकांचे झाले दणक्यात स्वागत, आहेत लोकप्रिय कलाकार

-‘बिग बॉस मराठी ३’च्या ग्रँड प्रीमियरला सुरुवात, ‘सिद्धू’ करतोय होस्टिंग, तर ‘या’ दोन स्पर्धकांची एन्ट्री

-गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अन्विता दिसतेय एकदम ‘बार्बी डॉल’, कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

हे देखील वाचा