Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘इंडियन आयडल १२’मध्ये शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी झाल्या पवनदीपच्या फॅन; काय म्हणाल्या तुम्हीच पाहा

सोना टीव्हीवरील सिंगिंग रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल’ प्रेक्षकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. या शोचा हा १२ वा हंगाम आहे. या शोने बॉलिवूडला दिग्गज गायक दिले आहेत. या शोमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक गायनात आपले भविष्य आजमावण्यासाठी येत असतात. दुसरीकडे या शोमध्ये निर्मातेही बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना बोलवत असतात. अशातच आता या आठवड्याच्या एपिसोडमध्ये बॉलिवूड सुपरस्टार शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम सिन्हा येणार आहेत. त्यांना आपल्या गाण्यांनी इम्प्रेस करण्यासाठी या शोमधील टॉप ७ स्पर्धक मंचावर शानदार परफॉर्मन्स सादर करणार आहेत. मात्र, पवनदीप राजनच्या परफॉर्मन्सने बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांची पत्नी पूनम सिन्हा यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पनवदीप या खास एपिसोडमध्ये ‘सलामत रहे दोस्ताना हमारा’ आणि ‘कोई होता जिसको अपना’ या गाण्यांवर परफॉर्मन्स देताना दिसणार आहे. (TV Show Indian Idol 12 Bollywood Superstar Shatrughan Sinhas Wife Is Fan of Pawandeep Rajan)

पवनदीपचा परफॉर्मन्स पाहून पूनम सिन्हा त्याच्या गायनाने खूपच प्रभावित झालेल्या दिसणार आहेत. तसेच त्याची प्रशंसा करत त्या म्हणणार आहेत की, “मला हे मान्य करावे लागेल की, तुच माझा सर्वात आवडता गायक आहेस.”

पूनम सिन्हा इंडियन आयडलच्या चाहत्या आहेत आणि त्या आपल्या घरीही हा शो पाहतात. त्यामुळे सर्व स्पर्धकांना त्या नावाने ओळखतात. तसं पाहिलं, तर त्यांनी या खास एपिसोडमध्ये सर्वांना प्रोत्साहन दिले. मात्र, पवनदीपच्या गाण्याने त्यांची मन जिंकले.

यावर पवनदीपची प्रतिक्रिया
शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या पत्नीने केलेल्या प्रशंसेनंतर पवनदीपने म्हटले की, “प्रत्येक आठवड्याला प्रसिद्ध गायक आणि प्रसिद्ध कलाकार इंडियन आयडल १२ मध्ये येतात. त्यांच्याकडून मिळालेली शाबासकी, त्यांचा सल्ला माझ्यासाठी अनमोल आहे. बॉलिवूडचे लिजंड शत्रुघ्न सर आणि पूनम मॅमला भेटून मी स्वत:ला भाग्यवान समजत आहे. त्यांनी माझा खूप उत्साह वाढवला आहे. मी वचन देतो की, मी पुढेही आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत राहील.”

पवनदीपने गायले दिग्गज किशोर कुमार यांचे गाणे
पवनदीपने गायलेले ‘सलामत रहे दोस्ताना हमारा’ हे गाणे शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. हे गाणे किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांनी गायले आहे. याव्यतिरिक्त विनोद खन्ना यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले ‘कोई होता जिसको अपना’ हे गाणे किशोर कुमार यांनी गायले आहे. पवनदीप हा इंडियन आयडलमधील असा गायक आहे, जो आपल्या गाण्यांमुळे एकदाही ट्रोल झाला नाही. त्याला देण्यात आलेल्या प्रत्येक गाण्याला तो योग्यप्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न करतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तेजस्विनी अन् स्वप्नीलने शेअर केले अत्यंत रोमँटिक फोटो; पाहायला मिळाली ‘समांतर २’ मधील बोल्ड केमिस्ट्रीची झलक

-बापरे बाप! ‘द कपिल शर्मा शो’साठी कपिलने केली मानधनात वाढ? एका आठवड्यासाठी घेणार ‘इतके’ कोटी

तापसीवर कंगनाची आगपाखड! म्हणाली, ‘मी सोडलेल्या चित्रपटांसाठी निर्मात्यांकडे भीक मागायची, आज तिची लायकी…’

हे देखील वाचा