Monday, June 17, 2024

व्वा… अतिसुंदर! दानिश मोहम्मदने ‘इंडियन आयडल १२’ शोच्या सेटवरच साजरी केली ईद, कोरोना निघून जाण्यासाठीही केली प्रार्थना

टीव्हीवरील प्रसिद्ध रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ हा टीआरपीच्या बाबतीत सर्वाधिक रेटिंग मिळवणाऱ्या शोपैकी एक बनला आहे. या शोने नवनवीन विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या वीकेंडच्या एपिसोडमध्ये प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंगला ट्रिब्यूट दिला जाणार आहे. हा शो आदित्य नारायण होस्ट करणार आहे, तर जज म्हणून नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि अनु मलिकही यामध्ये उपस्थित राहणार आहेत. सर्व स्पर्धक यामध्ये विशेष पाहुणे सुखविंदर सिंग यांच्यासमोर परफॉर्मन्स करण्यासाठी खूपच उत्सुुक आहेत.

विशेष म्हणजे शोच्या या एपिसोडमध्ये स्पर्धक दानिश मोहम्मदने ‘दावत ए इश्क है’ आणि ‘इस शान ए करम’ यांसारख्या गाण्यांवर परफॉर्मन्स करणार आहे. ज्यानंतर सर्व जज त्याची जोरदार प्रशंसा करताना दिसणार आहेत. दुसरीकडे एपिसोडमध्ये नेहा कक्कर म्हणताना दिसणार आहे की, “दानिश हा तुझा आतापर्यंतचा सर्वात चांगला परफॉर्मन्स होता आणि याचा आम्हाला अभिमान आहे.”

फरशीवर चटई टाकून केली प्रार्थना  (Danish Mohammed Celebrated Eid On The Set)
यानंतर हिमेश रेशमिया असे म्हणताना दिसेल की, “दानिश तू एक प्रतिभावान गायक आहे. खरं तर तू जोखीमही पत्करतो. तुझा हा परफॉर्मन्स इतिहासात नोंदवला जाईल.” याव्यतिरिक्त दानिश मोहम्मदने सेटवरच ईद साजरी केली. यावेळी त्याने फरशीवर चटई टाकून कोरोना व्हायरस निघून जाण्यासाठी प्रार्थना केली. हे शोच्या वीकेंड एपिसोडमध्ये दिसणार आहे. दानिशने मंचावर हाताने शिवलेला एक कुर्ता घातला होता, जो त्याच्या आई- वडिलांनी पाठवला होता. यानंतर सर्व ईदच्या आनंदात रमताना दिसतील. त्यांच्यासह दानिशचे आई- वडीलही आनंदात सामील होतील.

तिन्ही जज दिसणार दानिशला ईदी देताना
सणाचे हे वातावरण पाहता, दानिश मोहम्मदला तिन्ही जज ‘ईदी’ देणार आहेत. त्यानंतर शूटिंग सेटवर दानिश आपल्या भावना प्रकट करताना म्हणाला की, “या वर्षीची ईद माझ्यासाठी सर्वात यादगार आहे. कारण मी इतक्या चांगल्या शो आणि इतक्या गोड कुटुंबाचा भाग आहे. त्यांनी मला खूप सारे सरप्राईझ दिले आहेत. हे माझे सौभाग्य आहे की, मला इतके चांगले लोक मिळाले.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा