छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो म्हणून ‘कौन बनेगा करोडपती‘ या शोला ओळखले जाते. या शोची लोकप्रियता यावरून सिद्ध होते की, या शोने आतापर्यंत 13 यशस्वी पर्व गाजवले आहेत. तसेच, हे या शोचे 14वे पर्व आहे. या शोमध्ये सहभागी होऊन स्पर्धक मालामाल होतात. मात्र, काही प्रश्न असे असतात, जे त्यांना पुढे जाण्यासाठी अडथळा निर्माण करतात. असाच एक प्रश्न अमिताभ बच्चन यांनी एका स्पर्धकाला विचारला होता. मात्र, त्या प्रश्नाचे उत्तर स्पर्धकाला देता आला नाही. त्यामुळे स्पर्धकाला 50 लाख रुपये जिंकण्यात अपयश आले.
‘कौन बनेगा करोडपती 14’ (Kaun Banega Crorepati 14) या शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राऊंड जिंकणारा स्पर्धक मिर्झा ईशान बेग (Mirza Ishan Beg) हे होते. ते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यापुढे हॉट सीटवर विराजमान झाले. विशेष म्हणजे, मिर्झा बेग हे पेशाने लेडीज टेलर आहेत.
या एपिसोडमध्ये मिर्झा बेग यांच्यासोबत बिग बींनी चांगल्या गप्पा मारल्या. स्पर्धकानेही त्याच्या शिलाईसाठी वापरल्या जाणाऱ्या धाग्यांच्या डब्ब्यावर अमिताभ बच्चन यांचा ऑटोग्राफ घेतला. हे पाहून अमिताभही खूप भावूक झाले होते. त्यांनी स्पर्धकाची प्रशंसाही केली. खेळ सुरू झाल्यानंतर आपल्या ज्ञानाच्या जोरावर मिर्झा बेग यांनी कमाल केली. मात्र, त्यांना 50 लाखांच्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही.
संविधानावर आधारित 50 लाखांसाठीचा प्रश्न
मिर्झा बेग यांनी 25 लाख रुपयांसाठी योग्य उत्तरे देत ही रक्कम जिंकली. मात्र, जेव्हा 50 लाख रुपयांच्या प्रश्नाची वेळ आली, तेव्हा अमिताभ यांनी प्रश्न विचारला की, “संविधानाच्या कलम 1 मध्ये आपल्या देशाचे नाव म्हणून कोणत्या वाक्यांशाचा उल्लेख आहे?”
यासाठी त्यांनी चार पर्याय दिले होते. त्यामध्ये अ- भारत गणराज्य, ब- इंडिया, म्हणजेच भारत, क- भरत, एक अधिराज्य, ड- भारत संघ यांचा समावेश होता. याचे योग्य उत्तर होते- इंडिया, म्हणजेच भारत.
View this post on Instagram
स्पर्धकाने सोडला खेळ
मिर्झा ईशान बेग यांना या प्रश्नाचे उत्तर माहिती नव्हते. त्यांच्याकडे कोणतीही लाईफलाईन शिल्लक राहिली नव्हती. त्यांनी चुकीचे उत्तर दिले असते, तर त्यांना रक्कम गमवावी लागली असती. त्यामुळे त्यांनी खेळ सोडणे योग्य समजले. त्यांनी हा खेळ सोडला आणि 50 लाख रुपये जिंकण्याची संधी गमावली. मात्र, 25 लाख रुपये जिंकल्यामुळे मिर्झा बेग आनंदी होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मैंने पायल है छनकाई’ गाण्यावर बेभान हाेऊन थिरकली भाेजपुरी अभिनेत्री, व्हिडिओ जाेरदार व्हायरल
भाजप आमदार राम कदमांचा इशारा! म्हणाले, ‘आदिपुरुष महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही’