‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये रोशन सिंग सोधीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने शोच्या निर्माते असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जेनिफरने असित मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला असून निर्मात्याने तिला प्रत्युत्तर दिले आहे. अशात आता अनेक आरोप केल्यानंतर अभिनेत्रीने एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये तिने सत्य लवकरच समोर येईल असे म्हटले आहे.
जेनिफर मिस्त्रीने माध्यमाशी बाेलताना 15 वर्षांनंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो सोडण्याबद्दल सांगितले. रोशन कौर सोधी या नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीने निर्माता असित मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता आणि आता तिने व्हिडिओ शेअर करून त्यांना प्रतिउत्तर दिले आहे.
बर्याच काळापासून ती ज्या परिस्थितीला तोंड देत होती त्याबद्दल ती मोकळेपणाने बाेलली. इतकचे नव्हेत तर, जेनिफरने शेवटी निर्मात्यांना एक कडक संदेश देत इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केला आहे. ती म्हणाला, “मौनाला माझी कमजोरी समजू नका, मी गप्प बसले कारण माझ्यात शिष्टाचार आहे. सत्य काय आहे याचा देव साक्षी आहे. लक्षात ठेवा, त्याच्या घरात तुमच्यात किंवा माझ्यात काही फरक नाही.”
View this post on Instagram
जेनिफरने ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांवर आरोप केल्याची बातमी आल्यानंतर असित कुमार मोदी यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, ‘हा फक्त खोटा आणि बिनबुडाचा आरोप आहे आणि त्यात काहीही तथ्य नाही. ती फक्त आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. माझी प्रतिमा खराब करण्यासाठी ती हे सर्व करत आहे. ही माझी खरी प्रतिक्रिया आहे आणि मी काहीही लपविण्याचा प्रयत्न करत नाही. मी खऱ्या आयुष्यात कसा आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे.’
असित पुढे म्हणाला, ‘आम्ही तिला शो आणि माझ्या टीममधून काढून टाकले आहे. माझ्या दिग्दर्शकाने आणि टीमने तिला शोमधून जाण्यास सांगितले. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत आणि मी विचार न करता बोलत नाही. माझे प्रोडक्शन लवकरच तुम्हाला सर्व पुरावे आणि कागदपत्रे पाठवेल.’ असे आसित यांनी आपल्या स्पष्टीकरणात सांगितले. (tv `show taarak mehta ka ooltah chashmah actress jennifer mistry bansiwal shares video after accusing asit modi )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भाईजानसह ‘हे’ प्रसिद्ध कलाकार कोलकात्यातील कॉन्सर्टमध्ये ठाेकणार धूम, ‘इतक्या’ लाखात मिळणार तिकिट
रणवीरने भर मुलाखतीत दीपिकाला केले किस, अभिनेत्री लाजून झाली लाल, व्हिडिओ व्हायरल