स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘ये हैं मोहब्बतें‘मधून अभिनेत्री कृष्णा मुखर्जीला खूप प्रसिद्धी मिळाली. ‘ये है मोहब्बतें’मध्ये दिव्यांका त्रिपाठीच्या सुनेची भूमिका साकारल्यानंतर कृष्णा मुखर्जी माेठ्या प्रमाणात चर्चेत आली. त्यानंतर कृष्णा मुखर्जीने कलर्स टीव्हीच्या लोकप्रिय शो ‘नागिन’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आता ही अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कृष्णा मुखर्जी तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, कृष्णा मुखर्जी (krishna mukherjee) तिचा प्रियकर चिराग बाटलीवालासोबत 13 मार्च रोजी गोव्यात लग्नगाठ बांधणार आहे. हा विवाह साेहळा दोन्ही कुटुंबांच्या रितीरिवाजानुसार होणार आहे. ही अभिनेत्री बंगाली असली तरी तिचा प्रियकर चिराग बाटलीवाला पारशी आहे. सोमवारी म्हणजेच 13 मार्च रोजी हे जोडपे बंगाली रितीरिवाजानुसार लग्नबंधनात अडकणार आहेत, ज्यानंतर संध्याकाळी पाहुण्यांसाठी पारशी रितीरिवाजांनुसार डिनर पार्टीचे आयोजन केले जाईल.
View this post on Instagram
माध्यमातील वृतानुसार, या जोडप्याचे प्री-वेडिंग फंक्शन्स उद्या म्हणजेच शनिवार, 11 मार्चपासून सुरू होतील, उद्या संध्याकाळी कृष्णा मुखर्जी तिच्या हातावर चिरागच्या नावाची मेंहदी काढणार आहे, तर रविवारी गोव्याच्या समुद्रकिनारी या जोडप्याचा हळद आणि संगीत समारंभ पार पडेल.
View this post on Instagram
कृष्णा मुखर्जी आणि चिराग बाटलीवाला यांचा मनालीच्या हसीन व्हॅलीमध्ये मोठ्या थाटामाटात साखरपुडा पारा पडला. या जोडप्याच्या एंगेजमेंटमध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. एंगेजमेंट दरम्यान ही अभिनेत्री पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसली हाेती, तर तिचा बॉयफ्रेंड चिराग नेव्ही युनिफॉर्म घातलेला दिसला.
View this post on Instagram
अलीकडेच कृष्णा थायलंडमध्ये तिच्या गर्ल गँगसोबत बॅचलर पार्टीचा आनंद घेताना दिसली, ज्याचे फाेटाे देखील साेशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत.(tv show yeh hain mohabbatein fame krishna mukherjee to marry beau chirag batliwalla on 13th march goa beach )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मला जळणाऱ्या कब्री दिसायच्या’ बिग बॉस फेम सना खानने सांगितले खतरो के खिलाडीला नकार देण्याचे कारण
अभिनेत्री सुश्मिता सेन हिने सांगितला मिस युनिव्हर्स स्पर्धेचा रंजक किस्सा म्हणाली, ‘मला तेव्हा एवढी….,’