Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

श्वेता तिवारीचे ‘बोल्ड ऍंड ब्युटीफुल’ फोटोशूट आले समोर; कातिलाना अंदाज पाहून मुलगी पलकही झाली हैराण

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आजकाल तिच्या लेटेस्ट फोटोशूटबद्दल बरीच चर्चेत आली आहे. नुकतेच तिने एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे , ज्यात ती अधिकच तरुण दिसू लागली आहे. वाढत्या वयात ती फिटनेसच्या बाबतीतही तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करताना दिसत आहे. श्वेता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत राहते . पुन्हा एकदा अभिनेत्रीने आपल्या फोटोशूटने चाहत्यांची मने जिंकली आहेत.‌ श्वेता तिवारी वाढत्या वयासोबत अधिकच सुंदर होत चालली आहे, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

नुकतेच तिने तिच्या या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो इंस्टाग्रामवर अकाउंटवरुन शेअर केले आहेत, जे चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. श्वेताने या फोटोत ब्लॅक ड्रेस परिधान केला आहे आणि बोल्ड पोझ देऊन फोटो काढले आहेत. श्वेता सध्या ४० वर्षांची आहे. तरी ती अनेक तरूण अभिनेत्रींना मागे टाकते. तसेच तिचे बोल्ड फोटो यावेळीही बरेच चर्चेत आले असून, त्या फोटोला लाखोंच्या संख्येने लाइक्स मिळत आहेत.

श्वेताचे इंस्टाग्राम अकाऊंटवर जवळपास २६ लाखांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. चाहते श्वेताच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्स करत आहेत. श्वेताने तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना चकित केलं आहे. श्वेताच्या या पोस्टवर तिची मुलगी पलक तिवारीनेही कमेंट केली आहे. तिने लिहिले की,“जगातील सर्वात हॉट महिला आहे.” श्वेता आता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते . चाहत्यांशी संवाद साधण्याची एकही संधी ती सोडत नाही .

श्वेताच्या कामाबद्दल बोलायचे झाले , तर ती अखेरच्या वेळेस वरुण बडोला समवेत ‘ मेरे डॅड की दुल्हन ‘ या मालिकेमध्ये झळकली होती. गेल्याच वर्षी ही मालिका ऑफ एअर झाली होती. ती टीव्हीची लोकप्रिय मालिका ‘कसौटी जिंदगी की’ मधील तिच्या अभिनयाने ती घराघरात पोहचली होती. याशिवाय अभिनेत्री ‘नागीन’, ‘सीता और गीता’ यांच्यासह टीव्हीवरील अनेक मालिकांमध्ये दिसली आहे . तर आता अभिनेत्री ‘खतरो के खिलाडी’च्या १३ व्या सीझनमध्ये सहभागी झाली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ

-देशाबाहेरही व्यक्त केला जातोय सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा शोक; जॉन सीनाने वाहिली अभिनेत्याला श्रद्धांजली

-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…

हे देखील वाचा