Thursday, April 24, 2025
Home अन्य ‘हिरो नं १’ गोविंदाची भाची सौम्या सेठ करणार होती गरोदरपणात आत्महत्या, स्वत: अभिनेत्रीने केला खुलासा

‘हिरो नं १’ गोविंदाची भाची सौम्या सेठ करणार होती गरोदरपणात आत्महत्या, स्वत: अभिनेत्रीने केला खुलासा

फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे आपल्या चाहत्यांशी नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयावरून बोलताना दिसतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे सौम्या सेठ, जिच्या आयुष्यात अनेक चढ- उतार आले. पण त्यातूनही ती सुखरूप बाहेर पडली आहे. या काही गप्पा गोष्टी करण्यासाठी हल्ली सोशल मीडिया हे एकदम सोपे माध्यम झाले आहे. याच माध्यमावर आपल्या चाहत्यांशी बोलताना तिने असा काही धक्कादायक खुलासा केलाय की, ऐकून चाहतेही हैराण झाले.

सौम्या सेठ ‘नव्या- नई धडकन नए सवाल’ च्या माध्यमातून अल्पावधीतच घराघरात पोहोचली. काही मालिका केल्यानंतर तिने या कारकिर्दीला निरोप दिला आणि लग्नानंतर परदेशात स्थायिक झाली.

सौम्य सेठची अजून एक ओळख सांगायची झाली तर, तिचे आणि बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेते गोविंदाशी जवळचे नाते आहे. ती गोविंदाची भाची आहे. सौम्या सेठ अनेकदा तिच्या आयुष्याबाबत खुलासे करते. पण, आता तिने स्वत: बद्दल खुलासा केला आहे.

आयुष्यातील चढ- उतारांबद्दल बोलताना सौम्या म्हणाली की, एक काळ असा होता, जेव्हा मनात आत्महत्येचा विचार होता. तिच्या गरोदरपणाचे दिवस आठवत अभिनेत्रीने सांगितले की, “मी जेव्हा गर्भवती होते, तेव्हा मनात आत्महत्येचा विचार आला होता.”

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना अभिनेत्रीने सांगितले की, “जेव्हा ती तिच्या वाईट काळातून जात होती, तेव्हा तिच्या पालकांनी तिचे समर्थन केले.”

ती म्हणाली, “सन २०१७ मध्ये मी जेव्हा गर्भवती होते, तेव्हा मी खूप अस्वस्थ होते. माझ्या पालकांकडे येण्यापूर्वी मी आत्महत्या करण्याचे मार्ग शोधत होते. मग त्यांनी मला मदत केली, आणि मला त्या परिस्थितीतून बाहेर आणलं. मी आरशासमोर उभी होते, आणि स्वत: ला ओळखू शकत नव्हते.”

“मला दुखापत झाली होती. गरोदर राहिल्यानंतरही मी बरेच दिवस अन्न खात नव्हते. बरेच दिवस आरशासमोर उभे राहण्याचे धैर्य करू शकले नाही. मी स्वतः ला पाहिल्यावरही माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. मला फक्त माझे आयुष्य संपवायचे होते,” असेही पुढे बोलताना ती म्हणाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिल वाले दुल्हनियाच्या गॉंव की छोरीपासून ते टॉपच्या क्रिकेट अँकरपर्यंत मंदिरा बेदीच्या लूक्समधील ट्रान्सफॉर्मेशन

-जेव्हा रीना रॉय यांनी दिली होती शत्रुघ्न सिन्हा यांना धमकी, म्हणाल्या होत्या ‘८ दिवसात लग्न केले नाही तर…’

-जर कॉमेडीचा शहेनशाह सतिश कौशिकचा अस्सल अभिनय पाहायचा असेल तर हे पाच सिनेमे नक्की पाहा

हे देखील वाचा