Tuesday, June 10, 2025
Home बॉलीवूड आजही सुशांतला आपला आवडता सहकारी अभिनेता मानते अंकिता लोखंडे; म्हणाली…

आजही सुशांतला आपला आवडता सहकारी अभिनेता मानते अंकिता लोखंडे; म्हणाली…

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या विकी जैनसोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे. अंकिता अनेकदा सोशल मीडियावर विक्की जैनबरोबरचे आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. अंकिताने बॉलिवूडमध्येही आपला जम  चांगलाच बसवला आहे. तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. मागील वर्षी एक्स बॉयफ्रेेंड आणि बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या निधनानंतर अंकिता बरीच चर्चेत होती. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून अंकिता लोखंडे आणि सुशांतसिंग राजपूत यांची जोडी घराघरात पोहोचली होती. या जोडीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केले आहे. त्यादरम्यान दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती.

पण काही कारणांमुळे दोघांचे हे नाते फारसे पुढे जाऊ शकले नाही आणि दोघेही वेगळे झाले होते. यानंतर सुशांतसिंग राजपूतने गेल्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. दरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत अंकिताशी बोलताना, तिने दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतचे आवडता सहकारी अभिनेता म्हणून वर्णन केले आहे.

जेव्हा अंकिताला तिचा आवडता सहकारी अभिनेता कोण आहे? असे विचारला गेला, तेव्हा अंकिताने उत्तर दिले की, “मला वाटते सुशांत. कारण आम्ही पवित्र रिश्तामध्ये एकत्र काम केले होते.” त्याचवेळी, जेव्हा अंकिताला विचारले गेले की, नात्यात तिला काय सहन होत नाही. त्यावेळी त्यास उत्तर म्हणून ती म्हणाली होती, “नातेसंबंधातील खोटेपणा मी सहन करू शकत नाही. जर तुम्ही माझ्याशी खोटे बोललात, तर मी चौकशी करीन.”

“माझ्याबद्दल जे काही तुम्हाला वाटत असेल. मी आवडते की नाही, पण माझ्याशी प्रामाणिक राहा. मला माझ्या लोकांबद्दल खूप काळजी आहे. जर कोणी खोटे बोलले, तर मला फार राग येतो. जर तुम्ही माझ्याशी खोटे बोलत असाल, तर मी त्याबद्दल माहिती काढेल.” यापूर्वीही अंकिता लोखंडे, सुशांत सिंग राजपूतसोबतच्या तिच्या नात्याबाबत उघडपणे बोलताना दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आयुष्यात मित्र कमी आणि ट्रोलर्सच जास्त भरले आहेत’, म्हणत शालूची आपल्याच फोटोवर कमेंट

-ईद मुबारक! ‘संजू बाबा’ने कुटुंबासोबत दुबईत साजरी केली ईद, पत्नी मान्यताने फोटो केले शेअर

-‘या गरीब मुलासोबत काय करतेय?’ बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर अनुराग कश्यपची मुलगी ट्रोल

हे देखील वाचा